Today petrol, diesel rates: कच्च्या तेलाचे दर वाढले; पेट्रोल, डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

| Updated on: Jun 11, 2022 | 7:07 AM

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात राज्यासह देशातल्या प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

Today petrol, diesel rates: कच्च्या तेलाचे दर वाढले; पेट्रोल, डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई : कच्च्या तेलाच्या (Crude Oil) दरात तेजी कायम आहे. आज कच्च्या तेलाचे दर 122 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे (Fuel) नवे दर जारी करण्यात आले आहेत. कच्च्या तेलाच्या दरात तेजी असताना आज देखील पेट्रोल, डिझेलच्या (Petrol-Diesel) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सलग 21 व्या दिवशी इंधनाचे दर स्थिर आहेत. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या अबकारी करात कपात केली होती. अबकारी करात कपात करण्यात आल्याने पेट्रोल प्रति लिटर साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले होते. तेव्हापासून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान भारत रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी करत होता. मात्र आता रशिया आपल्या कच्च्या तेलाच्या खरेदीवर देण्यात येणारी सवलत बंद करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. असे झाल्यास भारतामध्ये पेट्रोल, डिझेलचे दर वाढू शकतात. सध्या भारतात सर्वात स्वस्त पेट्रोल, दिल्लीमध्ये तर सर्वात महाग पेट्रोल मुंबईमध्ये आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील दर

शहरंपेट्रोलडिझेल
मुंबई111.3597.28
पुणे111. 3098
नाशिक111.2595.73
नागपूर111.4195.73
कोल्हापूर111.0295.54

देशाच्या प्रमुख महानगरातील भाव

पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. देशात इंधनाचे दर स्थिर आहेत. आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये एवढा आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये असून, डिझेलचा भाव प्रति लिटर 94.24 रुपये लिटर इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये लिटर तर डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये इतका आहे. महानगरातील पेट्रोल, डिझेलच्या दराची तुलना केल्यास सर्वात महाग पेट्रोल हे मुंबईमध्ये असून, सर्वात स्वस्त पेट्रोल हे दिल्लीमध्ये आहे.

हे सुद्धा वाचा