आज सोन्याचे दर (Today’s gold-silver prices) स्थिर आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (gold) दरामध्ये सातत्याने चढ-उतार पहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात होत असलेल्या चढ -उताराच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण पहायला मिळत आहे. आज सोन्याचे दर स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 800 एवढा आहे. तर 24 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा अर्थात दहा ग्रॅमचा दर 52140 रुपये एवढा आहे. चांदीच्या किमतीमध्ये किंचितशी घट झाली असून, आज चांदीचा (silver) भाव 66300 रुपये एवढा आहे. सोन्याच्या दरात प्रत्येक शहरांप्रमाणे थोडा फार बदल होऊ शकतो, हे ग्राहकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. सोन्याच्या दागिन्यांचा दर सोन्याचा दर अधिक दागिन्याच्या घडनावळीचा दर मिळून निश्चित केला जातो. त्यामुळे सोन्याच्या कीमतीमध्ये कमी -अधिकप्रमाणात तफावत दिसून येते.
आज राज्यात सोन्याचे दर स्थिर आहेत. सोन्याच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गुड रिटर्न्स वेबसाईटकडून प्राप्त माहितीनुसार आज राज्यात सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 800 एवढा आहे. तर 24 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा अर्थात दहा ग्रॅमचा दर 52140 रुपये एवढा आहे. पाहुयात प्रमुख शहरातील सोन्याचे दर आज मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याची किंमत प्रति तोळा 47 हजार 800 इतकी आहे. तर 24 कॅरट सोन्याची किंमत प्रति तोळा 52140 रुपये आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 47 हजार 8050 इतकी आहे. तर 24 कॅरट सोन्याची किंमत 52190 रुपये एवढी आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 47 हजार 8050 इतकी आहे. तर 24 कॅरट सोन्याची किंमत 52190 रुपये एवढी आहे. आज चांदीच्या दरात किंचीतशी घसरण झाली असून, चांदीचे दर प्रति किलो 66300 रुपये झाले आहेत.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे, या युद्धाचा परिणाम हा जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत, कच्च्या तेलाच्या किमतीपासून ते खाद्यतेलाच्या किमतीपर्यंत सर्वच वस्तुंच्या दरात वाढ झाली आहे. युद्धामुळे आयात मंदावल्याने सोने देखील महाग झाले आहे. युद्ध सुरू झाल्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू असल्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण पहायाला मिळत आहे.
पेट्रोल, डिझेल दर वाढीसोबतच पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या भावात वाढ