मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून आज इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. मात्र नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या (Petrol & Diesel) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इंधनाचे दर स्थिर आहेत. आज सलग सातव्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. मागच्या आठवड्यात शनिवारी केंद्र सरकारने एक्साइज ड्यूटीमध्ये (Excise Duty) कपात केल्याने पेट्रोलचा दर प्रति लिटरमागे साडेनऊ रुपयांनी तर डिझेलचा दर प्रति लिटर मागे सात रुपयांनी स्वस्त झाला होता. केंद्र सरकारनंतर महाराष्ट्र, केरळ, ओडीशा या राज्यांनी देखील पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या व्हॅटमध्ये (Value-Added Tax) कपात केल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र सध्या वाढत असलेल्या कच्च्या तेलाच्या किमती पहाता भविष्यात पेट्रोल, डिझेलची दरवाढ अटळ असल्याचे बोलले जात आहे.
पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज देशासह राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज जारी करण्यात आलेल्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.25 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.73 रुपये आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल, डिझेलचा प्रति लिटर दर अनुक्रमे 111.02 आणि 95.54 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 112.97 असून, डिझेलचा दर प्रति लिटर 98.89 रुपये एवढा आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.92 रुपये एवढा आहे. ठाण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.7 तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.25 इतका आहे.
सलग सात दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज जारी करण्यात आलेल्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये असून डिझेलचा दर 94.24 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये इतका आहे.