नवी दिल्ली– शेअर बाजारात (SHARE MARKET UPDATE) मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव दिसून आला. आज (मंगळवारी) सेन्सेक्समध्ये 700 अंकाहून अधिक घसरण नोंदविली गेली. आज सेन्सेक्स 703 अंकांच्या घसरणीसह 56463 वर पोहोचला. निफ्टी 215 अंकांच्या घसरणीसह 16958 वर बंद झाला. आज टॉप-30 शेअर्समध्ये केवळ रिलायन्स आणि आयसीआयसीआय बँक शेअरमध्ये तेजी नोंदविली गेली. तर सर्व 28 शेअर घसरणीसह बंद झाले. आजच्या घसरणीत सर्वाधिक भर एचडीएफसी, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस शेअ्र्रर्सची पडली. एचडीएफसी बँकेचा शेअर सलग नवव्या दिवशी घसरणीसह बंद झाला. रिलायन्स शेअर्समध्ये (RELIANCE SHARES) आज 3.16 टक्क्यांच्या तेजीची नोंद झाली. आज निफ्टी आयटीमध्ये 3 टक्के, एफएमसीजीमध्ये 2.82 टक्के, रियल्टी इंडेक्समध्ये 2.47 टक्के, फायनान्शियल्स सर्व्हिसेस मध्ये 2 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदविली गेली. आज (मंगळवार) बीएसई सूचीबद्ध (BSE LISTED) (लिस्टेड) कंपन्यांचा मार्केट कॅप घसरणीसह 265.35 लाख कोटींवर पोहोचला आहे.
अपोलो हॉस्पिटल (5.75%)
कोल इंडिया (4.38%)
रिलायन्स (3.81%)
आयसीआयसीआय बँक (1.12%)
बीपीसीएल (1.10%)
एचडीएफसी (-5.45%)
एचडीएफसी लाईफ (-4.81%)
एसबीआय लाईफ इन्श्युरन्स (-4.15%)
एचडीएफसी बँक (-3.82)
टाटा कॉन्स प्रॉडक्ट (-3.76%)
एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड (HDFC BANK) विलिनीकरणाच्या चर्चेनंतर गुंतवणुकदारांत उत्साह संचारला होता. त्यामुळे शेअर बाजारातही सकारात्मक परिणाम नोंदवला गेला. मात्र, उत्साह अधिक काळ शेअर बाजारावर दिसून आला नाही. काही दिवसांतच शेअर मध्ये घसरणीचे सत्र सुरू झाले. गेल्या नऊ दिवसांत गुंतवणुकदारांना तब्बल 2.6 लाख कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले. एचडीएफसीच्या शेअरमध्ये (HDFC SHARE) नऊ ते दहा टक्क्यांची घसरण नोंदविली गेली आहे.गेल्या महिन्यात चार एप्रिलला एचडीएफसीची मार्केट वॅल्यू (MARKET VALUE) 9,18,591 कोटी रुपये होती आणि गेल्या नऊ दिवसांत 1.67 लाख कोटी रुपयांच्या नुकसानीसह 7,51,421 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर एचडीएफसी लिमिटेडची मार्केट वॅल्यू 4,85,692 कोटी रुपये होती. त्यामध्ये घट होऊन 3,94,097 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मार्केट वॅल्यूमध्ये 91,595 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
Bank Merger : विलिनीकरणाचा उत्साह मावळला, एचडीएफसी गुंतवणुकदार तोट्यात; 9 दिवसात 2 लाख कोटींवर पाणी