नवी दिल्ली : नवीन वर्षात गुंतवणुकीचा संकल्प (Investment Plan) सोडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही ही गुगल बाबावर जाऊन ‘टॉप 10 म्युचुअल फंड’ (Top 10 Mutual Funds) असा शोध घेत आहात काय? तुमच्या मित्रांकडे, ब्रोकरेज फर्म, गुंतवणूक सल्लागाराकडे चांगल्या फंडसाठी चौकशी करत आहात आणि त्यांच्या उत्तरावर तुम्ही साशंक असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. ऑनलाईन सर्चमध्ये (Online Search) अनेक जण तयार यादी टाकतात. अधिकत्तम म्युच्युअल फंड हे त्यांच्या अल्प मुदतीच्या कामगिरीवर या यादीत क्रमवारीने लावण्यात येतात. योग्य पर्याय निवडण्यात त्यामुळे गुंतवणूकदारांना (Mutual Fund Investors) अडचण येते.
बऱ्याचदा तुमचे मित्र, ऑफिसमधील सहकारी त्याच योजनांची नावे सांगतात, ज्यात त्यांची गुंतवणूक सुरु आहे. पण हा फंड तुमच्यासाठी कितपत योग्य असेल अथवा फायदेशीर ठरेल हे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांचा संभ्रम वाढतो. धोका नको म्हणून गुंतवणूक होत नाही.
काही गुंतवणूकदार केवळ यादीतील अग्रक्रम असलेल्या फंड्सकडेच आकर्षित होतात. त्याच्यापुढे त्यांची धाव जात नाही. त्यांची सांशकता कायम राहते. फायद्याचे गणित आणि जोखीम यामध्येच त्याचा निर्णय होत नाही. गुंतवणूक वाढली की नाही याचा ते दररोज पडताळा करतात.
त्यामुळे तुमच्यासाठी हे खास टॉप 10 म्युच्युअल फंड निवडले आहेत. उत्तम कामगिरी बजावणाऱ्या म्युच्युअल फंडची यादी तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. पाच वेगवेगळ्या श्रेणीतून दोन-दोन म्युच्युअल फंडची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या श्रेणीत त्यांची कामगिरी जोरदार आहे.
अग्रेसिव्ह हायब्रिड, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि फ्लेक्सी कॅप अशा पाच श्रेणी आहेत. त्यातील प्रत्येकी दोन-दोन म्युच्युअल फंडची कामगिरी आधारे निवड करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे फंड 2023 मध्ये चांगली कामगिरी बजाविण्याचा शक्यता आहे.
अर्थात हा अंदाज आहे. तो या फंडच्या कामगिरीनुसार वर्तविण्यात आला. या फंडमध्ये गुंतवणुकीचा निर्णय सर्वस्वी तुमचा असल्याने फंडविषयी आणखी माहिती घ्यावी. अभ्यास करावा. तुमच्या गुंतवणूकदार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ही आहे टॉप 10 म्युच्युअल फंडची यादी
1. अॅक्सिस ब्लूचिप फंड
2. मिराए अॅसेट लार्ज कॅप फंड
3. पराग पारीख फ्लॅक्सी कॅप फंड
4. युटीआय फ्लॅक्सी कॅप फंड
5. अॅक्सिस मिडकॅप फंड
6. कोटक इमर्जिंग इक्विटी फंड
7. अॅक्सिस स्मॉल कॅप फंड
8. एसबीआय स्मॉल कॅप फंड
9. एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड
10. मिराए अॅसेट हायब्रिड इक्विटी फंड