नवी दिल्ली : फोर्ब्सने जगातील श्रीमंतांची यादी (Forbes Richest List) प्रसिद्ध केली आहे. या लोकप्रिय बिझनेस मॅगझिनने 2023 मधील अब्जाधीशांची यादी जाहीर झाली. या यादीत अनेक भारतीयांचा बोलबाला आहे. पहिल्यापेक्षा भारतीय श्रीमंतांची संख्या पण वाढली आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) भारतासह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. या यादीत उद्योगपती गौतम अदानी यांचे पण नाव आहे. ते या यादीत टॉप-30 मध्ये सहभागी आहेत. फोर्ब्सने यंदा जाहीर केलेल्या अब्जाधीशांच्या यादीत एकूण 16 भारतीय अब्जाधीशांचे नाव आहेत. त्यात 3 महिला आहेत. यामध्ये लीना तिवारी यांचे नाव चर्चेत आहे.
फार्मा कंपनीचे नेतृत्व
फोर्ब्सच्या यादीनुसार, भारतातील पाच सर्वात श्रीमंत महिलांमध्ये लीना तिवारी यांचे नाव आहे. या यादीत सावित्री जिंदल, रोहिका सायरस मिस्त्री, रेखा झुनझुनवाला, विनोद राय गुप्ता आणि लीना तिवारी यांचे नाव आहे. लीना गांधी तिवारी यांचे नाव अनेकांना माहिती नाही. कारण त्या मीडियापासून दूर राहतात. त्या एका मोठ्या फार्मा कंपनीच्या मालकीण आहेत.
30,000 कोटींची संपत्ती
लीना तिवारी खासगी कंपनी USV इंडियाच्या चेअरपर्सन आहेत. त्यांची सध्याची नेटवर्थ 3.7 अब्ज डॉलर म्हणजे 30,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. लीना तिवारी बायोकॉनच्या किरण मजुमदार शॉ, Nykaa ची फाल्गुनी नायर आणि जोहो कॉर्पची राधा वेंबू यांच्या पुढे आहेत. त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत अग्रेसर आहेत.
टॉप-5 मध्ये कंपनी
फार्मा कंपनी कार्डियो-वस्कुलर ही त्यांची कंपनी आहे. भारतातील डायबिटीज सेक्टर मधील पाच मोठ्या कंपन्यांमधील ही एक कंपनी आहे. कंपनी अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रिडियंट्स (APIs), इंजेक्टेबल्स आणि बायोसिमिलर औषधे देखील बनवते. USV चे Glycoment नावाचे मधुमेहविरोधी औषध घरगुती उद्योगातील टॉप-3 औषधांमध्ये समाविष्ट आहे.
मुंबई विद्यापीठातून शिक्षण
लीना तिवारी यांचे शिक्षण मुंबईतील विद्यापाठीतून झाले आहे. त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली आहे. तर बोस्टन विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना पर्यटन आणि पुस्तक वाचण्याचा छंद आहे. त्या पार्टी कल्चरपासून दूर राहतात. त्या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.
प्रशांत तिवारी
लीना तिवारी यांचे पती प्रशांत तिवारी आहे. ते युएसव्हीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही कंपनी ते चालवितात. प्रशांत तिवारीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (IIT) मधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. अमेरिकेतील Cornell विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांना एक मुलगी आहे. तिचे नाव अनिशा गांधी तिवारी आहे.
अब्जाधीशांची संख्या किती
हुरुन ग्लोबल रिच लिस्टनुसार, (Hurun Global Rich) भारतात नवीन अब्जाधीश तयार झाले आहेत. नवीन श्रीमंत तयार होणाऱ्या देशांच्या यादीत भारताचे स्थान तिसरे आहे. जगभरात एकूण 176 अब्जाधीश तयार झालेत. ते पण केवळ 18 देशांमध्येच. या देशांतील 99 शहरातून हे अब्जाधीश येतात. या यादीत भारताच्या 16 अब्जाधीशांचा समावेश आहे. स्टॉक मार्केट (Stock Market) टायकून आणि बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला या यादीत सर्वात आघाडीवर आहे. म्हणजेच, या नव श्रीमंतात त्यांच्याकडे अधिक संपत्ती आहे.