नवी दिल्ली : एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची (Twitter) कमान सांभाळल्यापासून त्यांच्यावर चोहो बाजुंनी जोरदार हल्लाबोल सुरु आहे. त्यांच्या कित्येक निर्णयाला युझर्संनी (Users) जोरदार विरोध केला आहे. त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांचे ट्विट तर कधी, इतरांच्या ट्विटला (Tweet) त्यांनी दिलेले उत्तर चर्चेचा विषय ठरते. मस्क यांनी नुकतेच एक सर्वेक्षण केले. ट्विटरच्या सीईओ पदावरुन पायउतार व्हावे, का यासाठी मस्कने पोल घेतला होता. त्यावेळी त्याने एका ट्विटला दिलेला रिप्लाय (Reply) सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
जगात नावाजलेला युट्यूबर मिस्टरबीस्ट याने ट्विटरच्या सीईओपदासाठी इच्छा व्यक्ती केली. मिस्टर बीस्टने त्याच्या फॉलोअर्सला याविषयी प्रश्न विचारला होता की, तो मस्क यांची जागा घेऊ शकतो का? त्याने ट्विटरचे सीईओ पदी विराजमान व्हावे का? त्याने या पदासाठी स्वतःला योग्य व्यक्ती असल्याचा दावा केला.
त्याने ट्विट केले की, ” काय मी ट्विटरचा नवीन सीईओ होऊ शकतो?” , त्यावर मस्क यानेही रिप्लाय दिला आहे. हा प्रश्न बाहेरचा नसल्याचा टोला मस्क याने लगावला. मिस्टर बीस्टच्या ट्विटला आतापर्यंत 49 दशलक्ष व्यूज मिळाले तर 32,000 हून अधिक वेळा ते रिट्वीट झाले आहे.
Can I be the new Twitter CEO?
— MrBeast (@MrBeast) December 22, 2022
एका अहवालानुसार, गेल्या आठवड्यात मस्क याने ट्विटरच्या नवीन सीईओसाठी शोध सुरु असल्याचे संकेत दिले होते. त्यांनी एक पोल ही सुरु केला होता. त्यात आपण ट्विटरच्या सीईओ पदावरुन पाय उतार व्हावे का, असा सवाल विचारण्यात आला होता.
CNBC च्या एका अहवालानुसार, मस्क यांनी नवीन सीईओचा शोध अगोदरच सुरु केला होता. मस्क यांनी रविवारी हा पोल पोस्ट करण्यापूर्वीच नवीन सीईओसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांच्या जागी कोणत्या व्यक्तीचा क्रमांक लागेल, याची माहिती त्यांनी दिली आहे.
I will resign as CEO as soon as I find someone foolish enough to take the job! After that, I will just run the software & servers teams.
— Elon Musk (@elonmusk) December 21, 2022
युट्यूबर मिस्टरबीस्ट यांनी नवीन सीईओ होण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. अनेक जणांनी या पदासाठी इच्छुक असल्याचा दावा केला आहे. त्यांनी ही नवीन जबाबदारी स्वीकारताच ट्विटरमध्ये काय बदल करण्यात येईल, याचा दावा केला आहे.
दरम्यान एका ट्विटला रिप्लाय देताना मस्क यांनी नवीन सीईओ संदर्भात मिश्किल उत्तर दिले आहे. त्यानुसार, मी लवकरच, ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देईल, पण मला त्यासाठी माझ्यासारखाच वेडा माणसाचा शोध आहे. त्यानंतर मी ट्विटरच्या टीमसोबत काम करेल.