Cryptocurrency बाबतच्या एक ट्विटमुळे हिरो बनला झिरो, Elon Musk वर जगभरातून टीकेची झोड

| Updated on: May 20, 2021 | 5:20 PM

एलन मस्क (Elon Musk) यांच्या एका ट्विटचा बिटकॉईन (Bitcoin) या क्रिप्टोकरन्सीला (Cryptocurrency) मोठा फटका बसला आहे.

Cryptocurrency बाबतच्या एक ट्विटमुळे हिरो बनला झिरो, Elon Musk वर जगभरातून टीकेची झोड
Elon Musk
Follow us on

नवी दिल्ली : टेस्ला इंक (Tesla Inc) आणि स्पेसएक्स (SpaceX) या दोन बड्या कंपन्यांचे संस्थापक एलन मस्क (Elon Musk) यांनी एक ट्विट केलं. या ट्विटनंतर बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सीला (Cryptocurrency) मोठा फटका बसला. एलन मस्क यांच्या एका ट्विटनंतर बिटकॉईनचा मार्केटमधील भाव दिवसेंदिवस घसरत चालला आहे. याबद्दल त्यांनी आज अजून एक ट्विट केलं, या ट्विटनंतर मस्क यांना जगभरातील लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. (Twitterati says Elon Musk is the most hated person in world after his new tweet about Cryptocurrency)

एलन मस्क यांनी नेहमीच क्रिप्टोकरन्सीचे समर्थन केलं आहे आणि Bitcoin तसेच Dogecoin सारख्या क्रिप्टोकरन्सीवर ते सतत ट्वीट करत असतात. त्यांच्या प्रत्येक ट्विटचा बिटकॉइनवर, त्याच्या मूल्यावर जबरदस्त प्रभाव पाडला आहे आणि त्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होताना दिसून आली आहे. परंतु एलन मस्क यांनी नुकत्याच केलेल्या ट्विटने अनेक लोकांना दुखावले आहे. एलन मस्क यांनी अलीकडेच आपल्या ट्विटरवर जाहीर केले की, टेस्ला यापुढे बिटकॉइनमध्ये इलेक्ट्रिक कारसाठी देय (पेमेंट) स्वीकारणार नाही. तेव्हापासून, बिटकॉइनचे मूल्य सातत्याने कमी होत आहे.

एलन मस्क यांनी बिटकॉइन न घेण्याच्या निर्णय घेतल्यानंतर लोक त्यांचा विरोध करीत आहेत. एलन मस्क यांनी बुधवारी केलेल्या ट्विटमुळे लोक संतप्त झाले आहेत. एका व्यक्तीने त्यांना ‘मोस्ट-हेटेड’ पर्सन (अशी व्यक्ती जिचा सर्वात जास्त तिरस्कार केला जातो) ही पदवीही दिली आहे. क्रिप्टोकरन्सीचा भाव कोलमडल्यामुळे बऱ्याच लोकांनी आपल्या आयुष्यभराची जमा पुंजी गमावली आहे, लोकांनी यासाठी मस्क यांना जबाबदार धरले आहे. एका युजरने असे म्हटले आहे की, एलन मस्कवर विश्वास ठेवून त्यांनी त्यांच्या सेव्हिंगमधील मोठी रक्कम क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवली होती, ते सर्व पैसे त्यांनी आता गमावले आहेत.

एलन मस्क यांचं ट्विट नेमकं काय?

एलन मस्क यांनी ट्विट करत टेस्ला कंपनीच्या कार बिटकॉईनद्वारे खरेदी करता येणार नाहीत, अशी माहिती दिली. यामध्ये त्यांनी बिटकॉईन मायनिंग आणि त्यासंबंधी जीवाश्म इंधनाच्या वाढत्या वापरामुळं चिंतेत असल्याचं सांगितलं. बिटकॉईन ही चांगली संकल्पना आहे. मात्र, पर्यावरणाला नुकसान पोहोचवायला नको, असं एलन मस्क यांनी म्हटलं आहे.

टेस्लाकडून 1.5 अब्ज डॉलर्सचा बिटकॉइन खरेदी?

त्याचबरोबर मस्क असेही म्हणाले की, कंपनी अशा क्रिप्टोकरन्सीचा विचार करत आहे, ज्यावर बिटकॉइन मायनिंगमध्ये जितक्या उर्जेचा वापर होतो, त्याच्या किमान 1 टक्क्याहून कमी उर्जेचा वापर होईल. फेब्रुवारी 2021 मध्ये नियामक (रेग्युलेटरी) दाखल करताना टेस्लाने म्हटले होते की, त्यांनी 1.5 अब्ज डॉलर्सचा बिटकॉइन खरेदी केला आहे. याशिवाय त्यांनी बिटकॉइनमध्ये पेमेंट घेण्याबाबतही सांगितले होते.

एलन मस्क यांच्यामुळे यापूर्वी बिटकाईनमध्ये 14 टक्के वाढ

एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीनं बिटकॉईनचा वापर करुन कार खरेदी करता येईल, अशी घोषणा 8 फेब्रुवारीला केली होती. त्यावेळी बिटकॉईनच्या भावात 14 टक्के वाढ झाली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या ट्रेजरी फंडमध्ये 1.5 अब्ज डॉलर बिटकॉईन ठेवेल, असं म्हटलं होतं. मस्क यांच्या ट्विटमुळे क्रिप्टोकरन्सीचा भाव वधारू लागला होता. परिणामी अनेकांनी आपले पैसे क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवण्यास सुरुवात केली होती.

संबंधित बातम्या

अवघ्या तीन महिन्यात एलन मस्कची पलटी, Tesla कंपनी Bitcoin मध्ये पेमेंट स्वीकारणार नाही, कारण…