नवी दिल्ली | 4 ऑक्टोबर 2023 : शेअर बाजारात गुंतवणूकदार चांगल्या नफ्याच्या शोधात असतो. त्यासाठी अनेक कंपन्यांचे प्रोफाईल, गुंतवणूक तज्ज्ञांचे सल्ले याकडे त्याचे कान टवकारलेले असतात. त्यात एखादा शेअर वर्षभरात सातत्याने चांगला परतावा देत असेल तर तो गुंतवणूकदारांच्या गळ्यातील ताईत होतो. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (USFB) आणि उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेस (UFS) ही कंपनी गुंतवणूकदारांचे जणू एक प्रकारे पुनरुज्जीवनच करत आहे. या बँकेच्या शेअरने गुंतवणूकदारांना 18 टक्के हमखास परतावा दिला आहे. तरीही या बँकेच्या शेअरबाबत गुंतवणूकदार साशंक का आहेत?
अशी आहे कामगिरी
या शेअरने दमदार कामगिरी दाखवली आहे. या मार्चपासून हा शेअर 2.5 वेळा वधारला आहे. सध्या बाजारात अनेक कंपन्यांचे मर्जर-डिमर्जर सुरु आहे. काही कंपन्या एकत्र येत आहेत. तर काही कंपन्या स्वतंत्र होत आहे. या यादीत ही कंपनी पण आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (USFB) आणि उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेस (UFS) या दोन्ही कंपन्या एकत्र येत आहे. यापूर्वी घोषीत केल्याप्रमाणे युएफएस गुंतवणूकदारांना बँकेचा 11.6 टक्के शेअर मिळतील.
या शेअरची घौडदौड
युएफएसचा शेअर जोरदार घौडदौड करत आहे. त्याने बँकेच्या शेअरपेक्षा जास्त आघाडी घेतली आहे. या दोन्ही शेअरमध्ये सध्या 15-18 टक्क्यांची तफावत आहे. मंगळवारी युएफएसचा शेअर 581 रुपयांवर होता तर USFB चा शेअर 59 रुपये होता. दोन्ही शेअरची बाजारातील कामगिरी चांगली आहे.
कारण तरी काय
सध्या दोन्ही कंपन्यांचे गुंतवणूकदार संभ्रमात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विलिनीकरणाची प्रक्रिया वेळ खाऊ असल्याने ते सावध भूमिका घेत आहेत. कंपनीने या विलिनीकरणाविषयीची शेअर रेशोची माहिती गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिली होती. जर विलिनीकरणाला अधिक कालावधी लागला तर मग या 18 टक्के परताव्याचे आकर्षण गुंतवणूकदारांना नको आहे. ते इतर ठिकाणी गुंतवणुकीचा पर्याय शोधतील.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.