सोप्या भाषेत समजून घ्या- 5 नव्हे तर साडे सहा लाखापर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री कसं होणार?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

Union Budget 2019  नवी दिल्ली: निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने नोकरदारांना छप्परफाड गिफ्ट दिलं आहे. करपात्र उत्पन्नाची मर्यादा दुपटीने वाढवली आहे. त्यामुळे 2019-20 या आर्थिक वर्षात आता 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त अर्थात टॅक्स फ्री झालं असेल. यापूर्वी अडीच लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री होतं. 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री या मोठ्या घोषणेमुळे नोकरदारांना सर्वात […]

सोप्या भाषेत समजून घ्या- 5 नव्हे तर साडे सहा लाखापर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री कसं होणार?
Follow us on

Union Budget 2019  नवी दिल्ली: निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने नोकरदारांना छप्परफाड गिफ्ट दिलं आहे. करपात्र उत्पन्नाची मर्यादा दुपटीने वाढवली आहे. त्यामुळे 2019-20 या आर्थिक वर्षात आता 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त अर्थात टॅक्स फ्री झालं असेल. यापूर्वी अडीच लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री होतं.

5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री या मोठ्या घोषणेमुळे नोकरदारांना सर्वात मोठं गिफ्ट मिळालं आहे. पियुष गोयल यांच्या या घोषणेनंतर संसद सभागृहात मोदी मोदीचा जयघोष सुरु झाला. 5 लाख आणि त्यामध्ये 80C अंतर्गत मिळणारी दीड लाखांची सूट यामुळे तब्बल 6.50 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री असेल. या घोषणेमुळे जवळपास तीन कोटी मध्यमवर्गीय करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मात्र त्याचवेळी मोदी सरकारने नोकरदारांचा आनंद नियम आणि अटींमध्ये गुंडाळून टाकला. कारण 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं असलं तरी, त्यापुढे ज्यांचं उत्पन्न असेल, त्यांना जुन्या टॅक्स स्लॅबप्रमाणेच कर भरावा लागेल.

वाचा: बजेटमधील 6 महत्त्वाच्या घोषणा  

यापूर्वीचा टॅक्स स्लॅब

यापूर्वी अडीच लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होतं. त्यानंतर 2 लाख 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत 5 टक्के, 5 लाख 1 ते 10 लाख – 20 टक्के आणि 10 लाखांपेक्षा अधिक उत्पन्नावर 30 टक्के आयकर द्यावा लागत होता.

आताचा टॅक्स स्लॅब

आता 5 लाख रुपयांपर्यंत शून्य टॅक्स असेल. 80 C अंतर्गत गुंतवणूक केल्यास आणखी दीड लाखांची गुंतवणूक म्हणजेच एकूण 6.50 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री असेल. त्यानंतर 5 ते 10 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नासाठी 20 टक्के आणि 10 लाखांच्या पुढे 30 टक्के आयकर द्यावा लागेल.

इन्कम टॅक्स स्लॅब 2019-20 tv9marathi.com

उत्पन्न  कर दर (2018-19)        नवा कर दर 2019-20
2 लाख 50 हजार कर नाही (टॅक्स फ्री) 00
2 लाख 50 हजार ते 5 लाख 5 टक्के कर

tv9marathi.com

00
5 लाख 1 ते 10 लाख 20 टक्के कर

 

20 टक्के
10 लाखांपेक्षा अधिक 30 टक्के कर

 

30 टक्के

आधी किती कर द्यावा लागत होता, आता किती द्यावा लागणार?

उत्पन्न                      आधीचा टॅक्स                          आताचा टॅक्स

5 लाख                      13 हजार रुपये                        00

7.5 लाख                   65 हजार रुपये                        49,920 रु.

10 लाख                    1.17 लाख रुपये                      99,840 रु.

20 लाख                     4.29 लाख रुपये                     4.02 लाख रु

संबंधित बातम्या 

बजेटमधील 6 महत्त्वाच्या घोषणा  

संपूर्ण बजेट – Budget 2019 Live: बंपर बजेट! 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त  

साडे सहा लाखापर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री कसं होणार?