नवी दिल्ली : “निर्मला सीतारमन (Nirmala Sitaraman) यांनी सादर केलेला अर्थसंकल्प (Union Budget 2021) म्हणजे भाजपाचा निवडणूक जाहीरनामा (BJP) आहे, असा घणाघात महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) केला आहे. ठाकूर यांनी ट्विटद्वारे या अर्थसंकल्पाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Union Budget 2021 opposition party leaders reactions)
सर्वाधिक टॅक्स, रोजगार आणि स्थैर्य देणाऱ्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसणारा हा अर्थसंकल्प आहे. #Budget2021
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) February 1, 2021
“सीतारमन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे भाजपाचा निवडणूक जाहीरनामा आहे. ज्या राज्यात निवडणुका तिथे मोठमोठ्या आकड्यांचे पॅकेज द्यायचं”, असं ट्विट त्यांनी केलं आहे. मुंबईतून सरकारला सर्वाधिक कर मिळतो. अनेकांना रोजगाराची संधी आणि स्थैर्य मुंबई आमि महाराष्ट्रात प्राप्त होतं. मात्र यानंतरही केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबईच्या वाट्याला काहीच आलेलं नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसणारा आहे, असंही ठाकूर यांनी नमूद केलं.
राज्यात काही दिवसांपूर्वी कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. “कोरोना लस सर्वसामन्यांना मोफत देण्यात येणार की नाही, याबाबतची कोणतीही घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली नाही. तसेच या बजेटमधून कामगार वर्गासाठी कोणत्याही घोषणा करण्यात आल्या नाहीत. फक्त रोजगार पोर्टल बनवण्याची घोषणा म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे” असं ठाकूर यांनी स्पष्ट केलं.
करदात्या मध्यमवर्गाच्या हाताला काहीच लागलेलं नाही, स्लॅब बदलाची आशा होती मात्र अर्थमंत्र्यांनी निराशाच केली. #Budget2021
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) February 1, 2021
“या बजेटमधून करदाता असेलल्या मध्यमवर्गाला काहीच मिळालं नाही. यावेळेस स्लॅब बदलेल, अशी आशा होती. पण अर्थमंत्र्यांनी घोर निराशा केली”, असंही ठाकूर म्हणाल्या.
भारतमाला प्रोजेक्टसाठी 3.3 लाख कोटी रुपये दिले आहेत. रस्ते इन्फ्रास्ट्रक्चरसाठी इकॉनॉमिक कॉरिडोर बनवणार, 3,500 किमी नॅशनल हाईवेझ प्रोजेक्टअंतर्गत तामिळनाडुमध्ये 1.03 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात ही पुढील वर्षात करण्यात येणार आहे. यानुसार 1100 किलोमीटरचं केरळमध्ये राष्ट्रीय महामार्ग बनवण्यात येणार आहे. याअंतर्गत मुंबई-कन्याकुमारी कॉरिडोरही बनेल, केरळमध्ये यावर 65 हजार कोटी रुपये खर्च होतील. बंगालमध्ये 25 हजार कोटी रुपये देऊन उड्डाणपुल तयार करण्यात येणार आहे. तसेच कोलकाता-सिलीगुडी रस्त्याचं अपग्रेडेशन होणार आहे. सोबतच 34 हजार कोटी रुपये हे आसाममधील राष्ट्रीय महामार्गावर खर्चिले जाणार आहेत.
संबंधित बातम्या :
(Union Budget 2021 opposition party leaders reactions)