Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाने स्वस्ताईची वर्दी दिली. आज भावात प्रचंड घसरण झाल्याने देशात पेट्रोल-डिझेलच्या भावात ग्राहकांना दिलासा मिळाला. जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती...
Ad
भावात घसरण
Follow us on
नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलाने स्वस्ताईची वर्दी दिली. क्रूड ऑईलच्या किंमतीत मोठी घसरण झाली. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या भावात तफावत दिसून येत आहे. ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलमध्ये (WTI Crude Oil) जवळपास 2 डॉलरची घसरण नोंदविण्यात आली. आज हा भाव 78.80 प्रति बॅरल तर ब्रेंट क्रूड ऑईलमध्ये (Brent Crude Oil) 2 डॉलरची घसरण झाल्याने भाव 82.81 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आला. राज्यातील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price) फरक पडल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला.
तर भारतावर परिणाम नाही
रशिया पाठोपाठ आता इराण भारताला स्वस्तात कच्चा तेलाचा पुरवठा करत आहे. त्यामुळे प्रत्येक बॅरलमागे दोन रुपयांची बजत होत आहे. भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने नुकतीच याविषयीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार इराककडून भारताने तेल आयात कमी केली. त्यामुळे इराकने भारतासाठी कच्चा तेलाच्या किंमतीत कपात केली. भारताने जानेवारी महिन्यात इराककडून 78.92 डॉलर प्रति बॅरलने कच्चे तेल खरेदी केले होते. फेब्रुवारी महिन्यात भावात फरक पडला. भारताने 76.19 डॉलर प्रति बॅरलने इंधन खरेदी केले.