किडकिडत असला म्हणून काय झालं, एका शब्दावर शेअर बाजारात येतो भूकंप

| Updated on: Nov 03, 2023 | 3:35 PM

Share Market | राष्ट्राध्यक्ष हा प्रमुख असला तरी अमेरिकेच्या आर्थिक नाड्या मात्र या व्यक्तीच्या हातात आहे. या व्यक्तीचा आवाका केवळ युएस पुरता नाही तर त्याच्या एका निर्णयाचे जगभरात पडसाद उमटतात. महागाई कमी करण्यात आणि मंदीच्या लाटेतून अमेरिकेला बाहेर काढण्यासाठी ही व्यक्ती जोरकस प्रयत्न करत आहे.

किडकिडत असला म्हणून काय झालं, एका शब्दावर शेअर बाजारात येतो भूकंप
Follow us on

नवी दिल्ली | 3 नोव्हेंबर 2023 : अमेरिकन केंद्रीय बँक (US Federal Reserve) आणि अध्यक्ष जेरोम पॉवेल (Jerome Powell) गेल्या काही वर्षांपासून सातत्याने जागतिक पटलांवर गाजत आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय बँकेने व्याजदर वाढवले आहेत. त्याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर दिसून आला आहे. मागील दोन बैठकीत हे व्याजदर स्थिर आहेत. जेरोम पॉवेल काय बोलतात याकडे केवळ अमेरिकेचेच नाही तर जगभरातील केंद्रीय बँकांचे, अर्थतज्ज्ञांचे बारीक लक्ष्य असते. जेरोम यांचे भाषण शेअर बाजाराची दिशा आणि दशा ठरवते. जेरोम हे 1948 नंतरचे केंद्रीय बँकेवरील सर्वात श्रीमंत अध्यक्ष आहेत.

काय बोलतात याकडे जगाचे लक्ष

अमेरिकन केंद्रीय बँकेचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या वक्तव्यांना मोठे वजन आहे. ते काय बोलतात याकडे जगभरातील अर्थतज्ज्ञांसह केंद्रीय बँकांचे लक्ष असते. बँकेने व्याजदर वाढवला, कमी केला. त्यामागील भूमिका काय हे समजून घेण्यात येते. त्याचे पडसाद जगभरात उमटतात. त्याचे नकारात्मक-सकारात्मक परिणाम दिसून येतात. जगभरातील शेअर बाजारात त्यांच्या निर्णयाचे परिणाम दिसतात. परदेशी गुंतवणूकदार त्याआधारे गुंतवणुकीचे धोरण ठरवतात. त्यामुळे शेअर बाजार गडगडतो आणि तेजीत येतो.

हे सुद्धा वाचा

इतकी आहे संपत्ती

युएस फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल वकील आणि चालती-फिरती बँक आहे. पॉवेल यांनी 2018 मध्ये अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेचे 16 वे अध्यक्ष म्हणून कारभार हाकायला सुरुवात केली. त्यांची एकूण संपत्ती 55 दशलक्ष डॉलर आहे. 4 फेब्रुवारी, 1953 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी 1975 मध्ये प्रिंसटन विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदवी मिळवली. नंतर जॉर्जटाऊन विद्यापीठातून कायद्यात डॉक्टरेट मिळवली.

1992 मध्ये अमेरिकन प्रशासनात

पॉवेल यांनी पहिल्यांदा 1992 मध्ये जॉर्ज एचडब्ल्यू बुश यांच्या कार्यकाळात अमेरिकन प्रशासनात प्रवेश केला. 2012 मध्ये त्यांना फेडरल रिझर्व्ह बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे सदस्यत्व मिळाले. 2018 मध्ये त्यांची युएस फेडच्या अध्यक्षपदी निवड झाली. गेल्या पाच वर्षांपासून त्यांच्या हातात आर्थिक नाड्या आहेत. फार्च्यूनच्या एका रिपोर्टनुसार, जेरोम पॉवेल यांना वार्षिक 15,819,932 कोटी रुपये वेतन मिळते. याशिवाय त्यांना अनेक अनुषांगिक लाभ मिळतात. पॉवेल यांच्या पत्नीचे नाव एलिसा लियानॉर्ड आहे. त्यांना तीन मुलं आहेत.