शेअर बाजारात अमेरिकेतील संकटाची दहशत पाहायला मिळत आहे. याला काही कारणे देखील आहेत. आधी अमेरिकेतील डॉलरच्या मजबूतीने रुपयांत लागोपाट घसरण पाहायला मिळाली. ज्याचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे पाहायला मिळाले. दुसरे प्रमुख कारण अमेरिकेत फेड रिझर्व्हची बैठक आज रात्री होणार आहे त्यातील निकालाची भीती शेअर बाजारात पहायला मिळाली आहे.कारभार होण्याच्या काळात सेन्सेक्समध्ये 1000 हून अधिक अंकानी घसरण पहायला मिळाली आहे. तर दुसरीकडे गुंतवणूकदारांचे 3.17 लाख कोटी बुडाले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. चला तर पाहूयात शेअर बाजाराची अशी अवस्था का झाली आहे. कोण-कोणत्या कारणांनी शेअर बाजारात लागोपाठ घसरण सुरु आहे.
शेअर बाजारात मंगळवारी मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक दुपारी 12.17 वाजता 952.84 ने घसरुन 80,801.30 वर कारभार करीत आहे.कामकाज सुरु असताना सेन्सेक्स 80,732.93 आकड्यांसह दिवसाच्या निच्चतम पातळीवर पोहचला, दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख निर्देशांक निफ्टी 288.75 अंकाच्या घसरणीसह 24,379.50 वर कामकाज करीत आहे. तसेच कामकाज सत्रात निफ्टी सुमारे 300 अंकानी घसरून 24,366.40 आकड्यांवर पोहचला आहे.
शेअरबाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मुंबई शेअर बाजारात सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअरचा भाव 1.61 टक्के कोसळून कारभार करीत आहे. तर भारती एअरटेलच्या शेअरमध्ये तीन टक्के घसरण झाली आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसच्या शेअरमध्ये 1.64 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. तर एचडीएफसी बँकेचा शेअर 1.41 टक्के घसरण होऊन कारभार करीत आहे.अदानी पोर्ट, आयटीसी. टाटा मोटर्स आणि हिंदुस्थान युनिलिव्हरच्या शेअरमध्ये किरकोळ घसरण पाहायला मिळाली आहे.
शेअर बाजारात झालेल्या घसरणीने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. एक दिवस आधी सेन्सेक्सचा मार्केट कॅप 4,60,06,557.30 कोटी रुपये होते. जे मंगळवारी सेन्सेक्स 1000 अंकांहून अधिकची घसरण झाल्याने 4,56,89,322.41 कोटी रुपयांवर आला आहे. ज्यामुळे बीएसईचा मार्केट कॅपला 3,17,234.89 कोटीची नुकसान झाले आहे. तज्ज्ञांच्या मते शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.
फेड बैठकी आधीची दहशत : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या उद्या होणाऱ्या पॉलीसी बैठकी आधी गुंतवणूकदार सावध झाले आहेत. या बैठकीत सेंट्रल बँकांच्या व्याज दरात कपात होण्याची आशा आहे. CME FedWatch टूल बुधवारी 25 बेसिस-पॉइंट दर कपातीची 97 टक्के शक्यता दर्शवित आहे. अमेरिकेतील आकड्यांमुळे लागोपाठ महागाई आणि लवचिक अर्थव्यवस्थेचे संकेत मिळाल्याने फेडचे 2025 दर मार्गावर अनिश्चितता कायम आहे.
चीनची इकॉनॉमी कमजोर : सोमवारी जारी झालेल्या आकडेवारीवरुन समजले की नोव्हेंबरात चीनची विक्री अपेक्षापेक्षा हळू झाली आहे. किरकोळ विक्रीत केवळ तीन टक्के वाढ झाली आहे. जी ऑक्टोबर 4.8% च्या वाढी पेक्षा कमी आहे. तर औद्योगिक उत्पादनात ऑक्टोबरप्रमाणे साल दर साल 5.4 टक्के वाढ झाली आहे. ही जागतिक कमोडीटी मागणीला प्रभावित करु शकते. ज्यामुळे भारतात धातू, ऊर्जा आणि ऑटो सेक्टरसाठी जोखीम निर्माण होऊ शकते,जी चीनच्या आर्थिक आकड्यांवरुन संवेदनशील आहे. आजच्या कामकाजात निफ्टी धातू आणि ऑटो सेक्टरमध्ये 0.6% टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.
डॉलरची मजबूती : डॉलर इंडेक्स 106.77 वर स्थिर पाहायला मिळत नाही. परंतू या वर्षी यात पाच टक्के तेजी पाहायला मिळालेली आहे. अशा मजबूत डॉलरमुळे परदेशी गुंतवणूकदार भारताच्या शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास नाखूश होऊ शकतात.
वाढता व्यापार तोटा : नोव्हेंबरात भारताचा व्यापारी तोटा ऑक्टोबरच्या 27.1 अब्ज डॉलरवरुन वाढून 37.84 अब्ज डॉलर म्हणजे लाईफ टाईम हायवर पोहचला आहे. इम्पोर्ट बिलात झालेली वाढ आणि एक्सपोर्टमध्ये झालेली कमतरता त्यास कारणीभूत आहे. नोव्हेंबरात भारताचा व्यापार घाटा 37.8 अब्ज डॉलरवर वाढल्याने रुपयावर दबाव पडणार आहे. ज्यामुळे रुपयाच्या तुलनेत डॉलर 85 पर्यंत पोहचेल. आयटी आणि फार्मासारख्या निर्यातदारांना रुपयातील घसरणीचा फायदा होईल, परंतू आयात करताना त्यांची स्टॉक किंमतीवर प्रभाव पडणार आहे.
ग्लोबल मार्केटचा प्रभाव : ग्लोबल मार्केटच्या घसरणीचा थेट प्रभाव शेअर बाजारात स्पष्ट पाहायला मिळत आहे.अशी आशा आहे की अमेरिकी फेडरल रिझर्व्ह दरात कपात होईल, MSCI चा जपानच्या बाहेरील आशिया आणि प्रशांत शेअरचा सर्वात मोठा निर्देशांक 0.3% घरसला आहे. जपानचा निक्केई 0.15% टक्के कोसळला आहे. युरो स्टॉक्स 50 वायदा 0.16 टक्के घसरलेला पाहायला मिळाला आहे. तर जर्मनीचा DAX वायदा ( फ्यूचर ) 0.06% टक्के खाली होता. आणि FTSE वायदा ( फ्यूचर ) 0.24% टक्के कमजोर होता.