नवी दिल्ली | 15 ऑगस्ट 2023 : भारताच्या पेमेंट इकोसिस्टमने (Payment Eco System) जगाचे लक्ष वेधले आहे. युनिफाईट पेमेंट्स इंटरफेस अर्थात युपीआयचा (UPI) जगभर डंका वाजला आहे. सिंगापूर, जर्मनी, फ्रान्सच नाही तर अनेक देश या पेमेंट्स सिस्टिमविषयी उत्सुक आहेत. भारताचे युपीआय आता देशापुरते मर्यादीत राहिले नाही, तर ते आता ग्लोबल झाले आहे. त्याला जागतिक झळाळी मिळाली आहे. इतर देशांनाही भारताची ही सक्षम व्यवहार प्रणाली हवी आहे. त्यासाठी भारताकडे मागणी होत आहे. पण यामुळे अमेरिका चिंतेत पडली आहे. देशात सुरुवातीला युपीआयची टिंगल झाली होती. हँकर्सची भीती दाखवून ही सिस्टम चालणार नाही, अशी शेरेबाजी झाली होती. पण आता याच सिस्टमने अमेरिकेपुढे (America) आव्हान उभं केले आहे.
डिजिटल पेमेंटवर अमेरिकेचा कब्जा
भारतात यापूर्वी डिजिटल पेमेंटच्या नावाखाली डेबिट आणि क्रेडीट कार्डचा बोलबाला होता. या क्षेत्रात अर्थातच अमेरिकन कंपन्या मास्टरकार्ड आणि व्हिसाचा दबदबा होता. म्हणजे तुम्ही कोणत्याही भारतीय बँकेकडून क्रेडिट अथवा डेबिट कार्ड घ्या, त्याचे ऑपरेटिंग या दोन कंपन्याच करत होत्या. या कंपन्या मनमानी शुल्क आकारत होत्या. तसेच या कंपन्या भारतायींच्या आर्थिक आणि डिजिटल पेमेंट डेटावर लक्ष ठेवून होत्या. या कंपन्या भारतीय पेमेंट डेटा अमेरिकेतील सर्व्हरवर जतन करुन ठेवत होत्या. हा मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी रुपे डेबिट आणि क्रेडीट कार्ड आणण्यात आले.
एकाधिकारशाहीला आव्हान
पण तरीही या कंपन्याची दादागिरी कमी झाली नव्हती. त्यासाठी केंद्र सरकारने युपीआय पेमेंट सिस्टिम विकसीत केली. त्यासाठी राष्ट्रीय देयके महामंडळाने पुढाकार घेतला. ही पेमेंट सिस्टिम विकसीत झाली. आता युपीआय हे पेमेंट, व्यवहारासाठी सर्वात लोकप्रिय, सहज उपलब्ध प्लॅटफॉर्म झाला आहे. युपीआय आता परदेशात पण लोकप्रिय झाले आहे. त्यामुळे मास्टरकार्ड आणि व्हिसाच्या एकाधिकारशाहीला जबर धक्का बसला आहे.
आता पुन्हा धक्का
गेल्या वर्षापासून युपीआय पेमेंटवर फोनपे आणि गुगलपेची एकाधिकारशाही वाढली आहे. या दोन एपसह इतर ही एप मैदानात आहेत. पण यांचा बाजारातील वाटा अधिक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी युपीआय प्लगइन सिस्टम विकसीत केले आहे.
थर्ड पार्टीच गरजच नाही
युपीआय प्लगइन सिस्टममुळे ऑनलाईन पेमेंटसाठी थर्ड पार्टी एप्सची गरज उरणार नाही. या नवीन फीचरमुळे ऑनलाईन पेमेंटसाठी व्हर्च्युअल पेमेंट एड्रेसचा वापर करता येईल. त्यामुळे सहज पेमेंट होईल. त्यासाठी थर्ड पार्टी एपची गरज नसेल. त्यांच्याविना तुम्हाला थेट खात्यातून पेमेंट करता येईल.