नवी दिल्ली | 3 ऑक्टोबर 2023 : वेदांता कंपनी तिचा कारभार आता सहा कंपन्यांमध्ये वाटणार (Vedanta Demerger) आहे. या समूहातून 6 स्वतंत्र कंपन्या स्थापन होणार आहेत. त्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीनंतर हा पायंडा पडला आहे. अनेक कंपन्या डीमर्जरच्या रांगेत उभ्या आहेत. या वृत्ताचा चांगलाच परिणाम या शेअरवर दिसून येत आहे. इक्विटी बेंचमार्क सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही घसरणीवर आहे. पण वेदांताचा शेअर चांगली कामगिरी करत आहे. शुक्रवारी पण हा शेअर वधारला होता. मंगळवारी शेअरमध्ये 5 टक्क्यांची उसळी आली. हा शेअर बीएसईवर 4.74 टक्क्यांसह 233.05 रुपयांवर कारभार करत होता. तर इंट्राडेमध्ये हा शेअर 233.80 टक्क्यांपर्यंत पोहचला. कंपनीने 29 सप्टेंबर रोजी डीमर्जरची घोषणा केली होती. 28 सप्टेंबर रोजी हा शेअर 208.05 रुपयांवर बंद झाला होता.
या कंपन्या येतील अस्तित्वात
वेदांता लिमिटेडच्या संचालक मंडळाने डीमर्जरमधून 6 स्वतंत्र कंपन्या स्थापनमयाचा निर्णय घेतला आहे. या कंपन्यांमुळे गुंतवणूकदार फायद्यात येतील असा अंदाज आहे. वेदांता लिमिटेडच्या गुंतवणूकदारांना या पाच कंपन्यांचा प्रत्येकी एक शेअर मिळणार आहे. म्हणजे एका शेअरवर पाच शेअरचा फायदा होईल. जितके अधिक शेअर तेवढा अधिक फायदा होईल. वेदांता ॲल्युमिनियम वेदांता ऑईल अँड गॅस, वेदांता पॉवर, वेदांता स्टील अँड फेरस मटेरिअल, वेदांता बेस मेटल, वेदांता लिमिटेड या त्या कंपन्या आहेत.
कंपनीची चाल बाजारात चालेना
कंपनीने मोठ्या हिकमतीने हा निर्णय रेटला आहे. यापूर्वी काही दिवसांपासून या समूहावर संकटाचे काळे ढग दिसत आहे. फॉक्सकॉनशी बिनसल्यानंतर चिप प्रकल्प त्यांना पुढे न्यायचा आहे. तर काही दिवसांपासून शेअर बाजारात शेअर दमखम दाखवू शकलेला नाही. फंड रायझिंगसाठी हा खटाटोप सुरु असला तरी त्या आघाडीवर कितपत यश मिळेल याबाबत बाजारात साशंकता दिसून येते. कर्जाच्या मुद्यावर पण गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांचे लक्ष्य आहे..
लंबी रेस का घोडा नही
अनेक ब्रोकर फर्मला वेदांताविषयी आशा नाही. त्यांनी हा शेअर भविष्यात मोठी चमकदार कामगिरी करेल असे वाटत नाही. अनेक फर्मने त्यांचे रेटिंग वाढविण्याऐवजी कमी केले आहेत. तर या शेअरची टार्गेट प्राईस पण अत्यंत कमी ठेवली आहे. त्यामागे एक कारण म्हणजे डीमर्जरनंतर कंपनीत कॅश फ्लो कमी होणार आहेत. तसेच इतर ही अनेक कारणे आहेत. त्यामुळे या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि तुमचा अभ्यास महत्वाचा ठरणार आहे.