नवी दिल्ली | 25 January 2024 : लोकसभा निवडणूक 2024 आता एकदम तोंडावर आली आहे. सर्वच पक्ष निवडणुकीच्या प्रचारात गुंतले आहेत. यावर्षातील निवडणुकीत 50 लाखांहून अधिक नवीन मतदार त्यांच्या मतदानाचा हक्क बजावतील. प्रत्येकाने मतदानाचा वापर करुन त्यांचा लोकसभेचा प्रतिनिधी संसदेत पाठवावा. आज राष्ट्रीय मतदार दिवस (National Voters’ Day) आहे. जर तुम्ही वोटर आयडी कार्ड तयार केले नसेल तर ते लवकर तयार करुन घ्या. या सोप्या पद्धतीने तुम्हाला मतदार होता येईल. मतदान करण्यासाठी मतदार कार्ड आवश्यक आहे. मतदान कार्ड तयार करणे सोपे आहे. त्यासाठी अर्ज करता येईल, अशी सोपी आहे प्रक्रिया, जाणून घ्या..
कसा कराल मतदार आयडी कार्डसाठी अर्ज?
अर्ज केल्यानंतर काय कराल
मतदार कार्डासाठी अर्ज केल्यानंतर तुमच्या ई-मेल आयडीवर एक ईमेल येईल. या ई-मेल मध्ये एक लिंक असेल. त्याआधारे उमेदवाराला वोटर आयडी कार्ड तयार करण्यासाठी त्याचे स्टेट्स चेक करता येईल. एका महिन्याच्या आता त्याचे मतदार कार्ड तयार होईल.
मतदार कार्ड नाही मिळाले तर ?
अर्ज केल्यानंतर निवडणूक विभागाकडून कुठल्याही प्रकारचा संपर्क करण्यात आला नाही. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून फोन न आल्यास मुख्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन मतदार कार्डचे स्टेट्स चेक करता येईल. त्यासाठी तुम्ही ज्या राज्याचे रहिवाशी आहात, तिथल्या मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही, ते तपासा. जर तुमचे यादीत नाव असेल तर मतदार कार्ड तयार होण्यास वेळ लागणार नाही.
काय लागतील कागदपत्रे
मतदार कार्ड-आधार कार्ड लिंक
ज्या नागरिकांचे मतदार कार्ड आधार कार्ड आधारे तयार झालेले नाही. त्यांना आधार कार्ड आणि मतदार कार्ड यांची जोडणी करणे गरजेचे आहे. मतदानातील गडबडी आणि बोगस मतदार शोधण्यासाठी अथवा तुमच्या नावावर बनावट, डुप्लिकेट मतदान कार्ड असेल तर समोर येण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे. ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला मतदार कार्ड, आधार कार्डशी लिंक करता येते. त्यासाठी NVSP च्या पोर्टलवर जावे लागेल.