काय सांगता काय, तुमच्या Wallet चा पण असतो विमा! त्याचे फायदे तर जाणून घ्या

| Updated on: Feb 09, 2024 | 9:53 AM

Wallet Insurance | वॉलेटमध्ये आता पैशांसोबतच, वाहन परवाना, पॅन कार्ड, आधार कार्ड, क्रेडिट, डेबिट कार्ड आणि इतर अनेक महत्वाच्या गोष्टींनी आपला कप्पा शोधला आहे. त्यामुळे वॉलेट हरवले तर मोठा फटका बसतो. पण तुम्हाला माहिती आहे का, की या नुकसानीपासून वॉलेट विमा तुमचे रक्षण करतो ते? असतो तरी काय आहे विमा?

काय सांगता काय, तुमच्या Wallet चा पण असतो विमा! त्याचे फायदे तर जाणून घ्या
Follow us on

नवी दिल्ली | 9 February 2024 : वॉलेट हे आता खिशातील महत्वाचा भाग आहे. वॉलेटमध्ये क्रेडिट-डेबिट कार्ड, नोटा, आधार,पॅन, वाहन परवाना, मतदान कार्ड इतर ही महत्वाच्या गोष्टी असतात. वॉलेट हरवले अथवा चोरीला गेले तर मग मोठे संकट येते. सध्या ऑनलाईन पेमेंट होत असले तरी वॉलेटची साथ कोणी सोडलेली नाही. त्यातच तुमच्या चोरीला गेलेल्या वॉलेटमधील या कार्डच्या आधारे सायबर गुन्हेगार चुकीचा वापर करण्याची पण भीती असते. अशावेळी खिशातील वॉलेटसाठी खास विमा खरेदी करता येतो. काय आहे हा विमा, जाणून घ्या?

अनेक बँका देतात विमा

वॉलेट विम्याचे अनेक फायदे मिळतात. त्यामुळे वॉलेट चोरीला गेले, गहाळ झाले तरी तुम्हाला लाभ मिळतात. अनेक मोठ्या बँका वॉलेट इन्शुरन्स देतात. त्यामुळे तुमच्या आर्थिक महत्वपूर्ण बाबींना संरक्षण मिळते. ICICI Bank सुद्धा अशा प्रकारच्या विम्याची सुविधा देते. जाणून घ्या काय आहे या बँकेचा प्लॅन?

हे सुद्धा वाचा

योजना तरी काय?

ICICI बँकेच्या वन असिस्ट प्लॅनमध्ये वाहन परवाना, डेबिट, क्रेडिट कार्ड, ओळखपत्र, विमानाचे तिकिट यांना विम्याचे संरक्षण मिळते. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, बँकेच्या या विमा योजनेत तुम्हाला तात्काळ आपत्कालीन सेवा, आपत्कालीन रोख रक्कमेसाठी मदत, मोफत पॅन कार्ड आणि आपत्कालीन ड्रायव्हिंग लायसन्स बदलवणे, आपत्कालीन प्रवासाला मदत तसेच रोड साईड मदतीसह इतर अनेक सेवा मिळतात.

एका कॉलवर कार्ड्स ब्लॉक

तुमचे वॉलेट हरवले, चोरीला गेल्याचे लक्षात येताच तुम्ही एक कॉल करु शकता. एका कॉलवर तुम्हाला तुमचे सर्व कार्ड्स ब्लॉक करता येतात. हा एक हेल्पलाईन क्रमांक आहे. तो 24 तास सेवा देतो. या विमा योजनेसोबतच बँक तुम्हाला अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन पण देते.

कितीचा आहे हा प्लॅन?

आयसीआयसीआय वन असिस्टचे तीन प्लॅन आहेत. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सेवा मिळतात. पहिला प्लॅन 1599 रुपयांचा, दुसरा प्लॅन 1899 रुपयांचा आणि तिसरा प्लॅन 2199 रुपयांचा आहे. https://www.icicibank.com/personal-banking/cards/debit-card/debit-card-assist वर जाऊन तुम्हाला या विमा योजनेची माहिती घेता येते.