वॉरेन बफे यांना बसला 630 कोटींचा फटका! Paytm मधील हिस्सा विक्री, अनेकांच्या मनात पाल चुकचुकली

| Updated on: Nov 25, 2023 | 10:28 AM

Warren Buffett Paytm | अमेरिकेतील दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी पाच वर्षांपूर्वी पेटीएमची मुळ कंपनी, पालक कंपनी One 97 Communication मध्ये गुंतवणूक केली होती. आता त्यांनी या कंपनीतील त्यांची सर्व हिस्सेदारी विक्री केली आहे. याचे अनेक अर्थ काढण्यात येत आहे. पण या डीलमधून त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

वॉरेन बफे यांना बसला 630 कोटींचा फटका! Paytm मधील हिस्सा विक्री, अनेकांच्या मनात पाल चुकचुकली
Follow us on

नवी दिल्ली | 25 नोव्हेंबर 2023 : अमेरिकेतील दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांना भारतात 630 कोटींचा मोठा झटका बसला आहे. बफे यांनी पेटीएमची मूळ कंपनी One 97 Communication मधील सर्व गुंतवणूक काढून घेतली. सर्व वाटा, हिस्सा विकला. अर्थात या सर्व घडामोडींचे अनेक अर्थ काढण्यात येत आहे. त्याचा पेटीएमच्या भविष्यातील वाटचालीविषयी पण तर्कवितर्क काढण्यात येत आहे. बफे यांनी इतका मोठा निर्णय घेतल्याने इतर गुंतवणूकदारांच्या मनात पण पाल चुकचुकली. त्यामागील कारणांचा शोध घेण्यात येत आहे.

का सहन केले आर्थिक नुकसान?

बफे यांची कंपनी बर्कशायर हॅथवेने 2018 मध्ये पेटीएममध्ये 2.6 टक्के हिस्सा खरेदी केला होता. त्याचे मूल्य 2,200 कोटी रुपये होते. हा सौदा त्यावेळी 10 अब्ज डॉलरचा झाला होता. बफे यांची ही भारतातील एकमेव गुंतवणूक होती. बर्कशायरने 17,027,130 शेअर 1279.70 रुपये प्रति शेअरने खरेदी केले होते. त्यातील काही शेअर्सची त्यांनी 2021 मध्ये आय पेटीएम आयपीओच्या माध्यमातून विक्री केले. शुक्रवारी बर्कशायर हॅथवेने तिची सहयोगी कंपनी बीएच इंटरनॅशनल होल्डिंग्सच्या माध्यमातून पेटीएममधील त्यांचा संपूर्ण हिस्सा (15,623,529 शेयर) 877.2 रुपये प्रति शेअर भावाने विक्री केला.

हे सुद्धा वाचा

630 कोटींचा आर्थिक फटका

या विक्रीतून बर्कशायरला 1,371 कोटी रुपये मिळाले. बफे यांच्या कंपनीला जवळपास 630 कोटींचा आर्थिक फटका बसला. फेब्रुवारी महिन्यात वन 97 कम्युनिकेशन्सने शेअर बायबॅक योजना आणली होती. त्यानंतर त्यांनी 546 रुपये भावावर 1.55 कोटी रुपयांहून अधिक शेअरची विक्री केले. शेअरच्या किंमतीत 68 टक्क्यांची तेजी दिसून आली. 20 ऑक्टोबर रोजी 21 महिन्यांच्या उच्चस्तरावर पोहचले. शुक्रवारी कंपनीचा शेअर एनएसईवर जवळपास 3 टक्क्यांनी घसरला. हा शेअर 895 रुपयांवर बंद झाला.

पेटीएमचा आयपीओ

पेटीएमची पॅरेंट कंपनीने दुसऱ्या तिमाहीतील तोटा कमी झाला. एक वर्षांपूर्वी हा 572 कोटी रुपये होता. तर आता तो 292 कोटी रुपये आहे. या दरम्यान एकत्रित महसूल 32 टक्के तेजीसह 2,519 कोटी रुपयांवर पोहचला. समान कालावधीत एक वर्षांपूर्वी हा महसूल 1,914 कोटी रुपये होता. वन 97 कम्युनिकेशन्सचा 18,300 कोटी रुपयांचा आयपीओ नोव्हेंबर 2021 मध्ये उघडला होता. त्याची इश्यू प्राईस 2,150 रुपये होती.