दोन व्यक्तींचा सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या एक होणे म्हणजे लग्न. पण विवाह सोहळा हा केवळ दोन व्यक्तींची भेट नाही. तर त्या दोघांचे कुटुंब, विचार, व्यवहार यासह सामाजिक मिलाफ या सर्वांचा त्यात समावेश होतो. लग्न तसे म्हटले तर समाजातील एक छोटा घटक आहे. एक छोटं युनिट, पण ते समाजाला पुढे आकार देण्याचं काम करतं. या पवित्र नात्यावर पुढे समाजातील अनेक गोष्टींवर, घटकांवर परिणाम होतो. त्यामुळे अशा पवित्र कार्यात विम्याचा विषय कसा काय येऊ शकतो बुवा? असा प्रश्न तुम्हाला पडले असेल, नाही का? जाणून घेऊयात…
लग्नाचा धुमधडाका
लग्न हा आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. तो कायम स्मरणात राहावा यासाठी अनेक जण विवाह हा सोहळा करतात. धुमधडाक्यात लग्न करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. नातेवाईकांना, आप्तेष्टांना, इष्टमित्रांना एकत्र आणण्याचे हे एक माध्यम ठरते. त्यामुळे आजकाल लग्नाला एखाद्या इव्हेंट सारखं साजरं केलं जाते. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या आकड्यांवरुन ही गोष्ट समोर येते. या वर्षी संपूर्ण देशात जवळपास 35 लाख लग्न लागले. त्यावर जवळपास 4.25 लाख कोटींचा खर्च करण्यात आल्याचा अंदाज या संस्थेने वर्तवला आहे.
लग्नकार्यावर मोठा खर्च
ग्लोबल वेडिंग सर्व्हिसेज मार्केटच्या आकड्यानुसार, 2020 मध्ये लग्न कार्यावर 60.5 अब्ज डॉलर इतका खर्च करण्यात आला होता. तर 20230 पर्यंत लग्नावरील खर्चाचा आकडा हा 414.2 अब्ज डॉलरवर पोहचेल. पण लग्नकार्यात सर्वच काही सुरळीत होते असे नाही. काही लग्न कार्यात इतर विघ्न पण येतात. कुठे सिलेंडरचा स्फोट होतो. तर कुठे चोरी होते, दागदागिने चोरीला जातात. तर लग्नस्थळी आग लागण्याचे आणि कुणाला तरी इजा होण्याचे प्रकार घडतात. अशावेळी आता कंपन्यांनी लग्न विमा पॉलिसी (Wedding Insurance Policy) सुरु केली आहे. ही पॉलिसी एखाद्या सुरक्षा कवचासारखी काम करते. या पॉलिसीचा हप्ता तुमच्या एकूण लग्नानुसार निश्चित होतो.
विम्यात काय काय होते कव्हर
या परिस्थितीत नाही मिळत भरपाई?
एखाद्या वादामुळे, किरकोळ कारणांमुळे लग्न रद्द करावे लागले तर विमा कंपनी नुकसान भरपाई देत नाही. हुंड्याच्या कारणावरुन लग्न मोडल्यास भरपाई विसरुन जा. लग्नात निष्काळजीपणे अथवा जाणूनबुजून नुकसान झाल्याचे लक्षात आल्यावर भरपाईची रक्कम मिळत नाही. आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न अथवा वर, वधू पसंत नसल्याच्या कारणावरुन दोघांपैकी एकाने स्वतःला इजा केल्यास भरपाईची रक्कम विमा कंपनी देत नाही.