नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात (Sarafa Bazar) चांदीला लकाकी आली आहे तर सोने ही चमकले आहे. या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold-Silver Rate) चांगलीच वाढ झाली आहे. त्यात या व्यापारी सप्ताहात सोन्याचे भाव 254 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढले आहेत. तर चांदीच्या किंमतीत 1,387 रुपये प्रति किलोग्रॅम अशी मजबूत वाढ झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची (Investors) चांदी झाली. सोन्यातील तेजीचा आलेख स्थिरावल्याचे दिसून आले.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजे आईबीजीए (IBJA)नुसार , या आठवड्यात (21 ते 25 नोव्हेंबर ) सुरुवातीला, 21 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा (Gold) भाव 52,406 रुपये होता. शुक्रवार तो 52,660 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
तर चांदीच्या किंमतीत जोरदार वाढ झाली. चांदीने आठवड्याभरातच हजारचा टप्पा पार केला. त्यामुळे गुंतवणूकदारांची चांदीच चांदी झाली. 999 शुद्ध चांदीची (Silver) किंमत 60,442 रुपयांहून वाढून 61,829 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.
IBJA च्या संकेतस्थळावर वेगवेगळ्या शुद्धतेचे सोन्याचे प्रमाणित भाव दररोज देण्यात येतात. हे सर्व भाव कर आणि घडणावळीवर (Tax and Making Charges) आधारीत असतात. त्यात देशभरात किंमतीत थोडाबहुत फरक पडतो. या किंमतीत GST चा समावेश नसतो.
गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत झालेला बदल
21 नोव्हेंबर, 2022- 52,406 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 नोव्हेंबर, 2022- 52,513 रुपये प्रति 10 ग्रॅम
23 नोव्हेंबर, 2022- 52,418 रुपये प्रति 10 ग्रॅम
24 नोव्हेंबर, 2022- 52,713 रुपये प्रति 10 ग्रॅम
25 नोव्हेंबर, 2022- 52,660 रुपये प्रति 10 ग्रॅम
गेल्या आठवड्यात चांदीच्या किंमतीत झालेला बदल
21 नोव्हेंबर, 2022- 60,442 रुपये प्रति किलोग्रॅम
22 नोव्हेंबर, 2022- 61,551 रुपये प्रति किलोग्रॅम
23 नोव्हेंबर, 2022- 61,700 रुपये प्रति किलोग्रॅम
24 नोव्हेंबर, 2022- 62,266 रुपये प्रति किलोग्रॅम
25 नोव्हेंबर, 2022- 61,829 रुपये प्रति किलोग्रॅम