Budget 2020 नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (1 फेब्रुवारी) लोकसभेत आर्थिक वर्ष 2020-21 चा अर्थसंकल्प (वहीखातं) सादर केला (Provisions for Farmers in Indian Budget 2020). यात सीतारमण यांनी शेतकऱ्यांसाठी 16 सूत्रीय कार्यक्रम जाहीर केला.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, “शेती पंपांना सौर उर्जेवर जोडण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. या अंतर्गत 20 लाख शेतकऱ्यांना सौरउर्जा संयंत्र दिलं जाईल. जी राज्ये केंद्र सरकारच्या कायद्यांचं मॉडेल स्वीकारतील त्यांना प्रोत्साहन दिलं जाईल. अन्नदाता उर्जादाता देखील आहे. पंतप्रधान कुसुम योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. पाण्याच्या प्रश्नाशी झुंज देत असलेल्या 100 जिल्ह्यांसाठी व्यापक उपाय योजना केल्या जातील. 2009-14 दरम्यान चलनवाढ 10.5% होती.”
शेतकऱ्यांसाठी 16 कलमी कार्यक्रम
आमचं सरकार 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कटीबद्ध आहे. शेती व्यवसायाला स्पर्धात्मक बनवत शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चित केलं जाईल. कृषी आणि संलग्न उपक्रम, सिंचन, ग्रामीण विकास क्षेत्रासाठी 2020-21 वर्षासाठी 2.83 लाख कोटी रुपयांचे वाटप करण्यात आलं : अर्थमंत्री निर्मला सीतारमण
#Budget2020 शेतकऱ्यांसाठी काय?
?शेतकऱ्यांसाठी 16 कलमी योजना,उत्पन्न दुप्पट करण्याचं ध्येय
?शेतकऱ्यांसाठी 6.11 कोटी विमा योजना
?कृषी पंपांना सौर ऊर्जेशी जोडणार,20 लाख शेतकऱ्यांना लाभ
?100 जिल्ह्यातील शेतीसाठी पाणी योजना
?शेतीमाल वाहतुकीसाठी रेल्वे https://t.co/63pAWpXwkM— TV9 Marathi (@TV9Marathi) February 1, 2020
देशभरात शेतकऱ्यांनासाठी शीतगृहांची साखळी तयार केली जाईल. यासाठी भारतीय रेल्वे ‘पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीप’ (PPP) शेतकरी रेल्वे तयार करेल. त्याचा उपयोग करुन लवकर खराब होणारा माल तात्काळ ने-आण करता येईल. ही ‘कृषी उडाण’ योजना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवरही तयार केली जाईल, असंही आश्वासन सीतारमण यांनी दिलं.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य आहे. शेतकऱ्यांसाठी 6.11 कोटीची विमा योजना असेल. प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उथ्थान महाभियान’ (PM KUSUM) या पुढील काळात 20 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहचेल. या अंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारे पाण्याचे पंप दिले जातील : अर्थमंत्री निर्मला सीतारमण