मंदी म्हणजे काय, नेमकी कारणे कोणती? मंदीत हे व्यवसाय असतात नफ्यात, जाणून घ्या

| Updated on: May 11, 2024 | 8:01 PM

नेमकी मंदी म्हणजे काय? देशात मंदी येण्याची नेमकी कोणती कारणे आहेत? मंदीपासून वाचण्यासाठी कोणते व्यवसाय करावेत जेणेकरून आपल्यापासून तोटा दूर राहील. नेमकी मंदी काय आहे आणि आपला व्यवसायाला त्यापासून कसा वाचवावं हे समजून घ्या.

मंदी म्हणजे काय, नेमकी कारणे कोणती? मंदीत हे व्यवसाय असतात नफ्यात, जाणून घ्या
Follow us on

आता विषमता म्हणजे काय तर, 90 टक्के लोकांकडे करोडोंची संपत्ती असते. तर उरलेल्या 10 टक्के लोकांकडे हजार रूपये सुद्धा नसतात. विषमतेमुळे खालच्या लोकांचे विभाजन होते. म्हणजे राष्ट्रीय स्तरावर जी संपत्ती येते, याचे दोन्ही गटात विभाजन होते. मात्र त्यात विभाजन पहायला मिळते. श्रीमंत लोकांकडे पैसा वाढत जातो आणि गरीब मात्र तसाच राहतो. गरीब मात्र तसाच राहतो. याच एक आपण उदाहरण पाहूया. जेव्हा समाजात विषमता बघायला मिळते, तेव्हा बाजारात बिजनेस करणारे आपला माल बाजारात विकायला आणतो, त्यावेळी गरीब माल घेत नाही, माल पडून राहायला लागतो. मग बिजनेस मॅन विचार करतात, माल आहे अजून मग मी का नवीन उत्पादित करू? त्यामुळे कंपनीवर परिणाम होतो, कंपन्या बंद पडतात, लोकांच्या नोकऱ्या जातात, आणि पुन्हा बेरोजगारी वाढते.

बेरोजगारी वाढायला लागली की पुन्हा लोकांची खरेदी क्षमता कमी होते. पुन्हा तेच सुरू होत, बाजारात माल पडून राहतो, पुन्हा दुसऱ्या कंपन्या बंद, पुन्हा बेरोजगारी वाढ. आता या सगळ्या मुळे उत्पादन कमी होत, त्यामुळे GDP कमी होतो, ग्रोस डोमेस्टिक प्रॉडक्ट, अर्थव्यवस्थेचा आकार मोजला जाणारा एक उपाय GDP. बाजारात उत्पादन कमी झाल्याने देशाचा GDP कमी होतो, आणि देशात सलग सहा महिने जर GDP कमी होत गेला तर त्याला अर्थशास्त्रात मंदी/आर्थिक मंदी असे म्हंटले जाते. याचे तीन प्रकार असतात, Slow Down म्हणजे मंदी पूर्वीची परिस्थिती, Reccesion म्हणजे मंदी आणि Great Depression म्हणजे महामंदी.

काय आहेत मंदीची कारणे?

लोकसंख्या – सर्वच विकसीत देशांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा कमी झाला आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर निश्चितच होतो. देशातील काम करणाऱ्या व्यक्तींच्या गटाची म्हणजेच 15 ते 60 वयोवर्षे गटातील संख्या कमी असेल तर त्याचा फटका औद्योगिक उत्पादनक्षमतेवर होतो. तंत्रज्ञानाच्या या जगात आऊटसोर्सने किंवा रोबोटच्या माध्यमातून कामं होतील, त्यामुळे लोकांच्या रोजगारावर मोठा परिणाम होऊ शकतो. रोजगार नसेल तर बाजारपेठेतील खरेदी विक्रीचे चक्र योग्य गतीने चालणार नाही.

देशात वृद्धांची संख्या वाढली की त्यांचे पेन्शन तसेच वेगवेगळ्या आरोग्य कल्याण योजनांवर सरकारला जास्त पैसा खर्च करावा लागतो. जपानला देशातील वाढत्या वृद्ध नागरिकांची समस्या सतावतीय. त्याचबरोबर देशातील गुणवत्ताधारक तरुणांची संख्या कमी असल्यास परदेशी कामगारांसाठी देशाची दारं उघडावी लागतात. जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा ही विकसीत देश याची मुख्य उदाहरणे आहेत. युरोपातील डेन्मार्क या देशाने लोकसंख्या वाढीला चालना देण्याची योजना सुरु केली आहे. याचे मुख्य कारण काम करणाऱ्या व्यक्तींच्या गटाची संख्या वाढवणे हे आहे.

बँकिंग व्यवस्था – देशाची बँकिंग व्यवस्था हा आर्थिक मंदीचा महत्वाचा घटक आहे. भारतासारख्या देशात बँकांवर सरकारचे नियंत्रण असते. त्यामुळे व्याज दर, पत धोरण ठरवण्याबरोबरच कर्जाचे वाटप आणि तोट्यातील उद्योग विकत घेण्यापर्यंतच्या निरनिराळ्या कामात सरकार बँकांचा वापर करते. राजकीय दबवामुळे झालेले कर्जाचे वाटप आणि त्यामुळे निर्माण झालेली बुडीत खात्यांची मोठी संख्या ही भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील गंभीर समस्या आहे.

त्याचबरोबर कमी व्याज दरात मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप झाल्याने बांधकाम क्षेत्रामध्ये कृत्रिम फुगवटा निर्माण झाला. घरांची संख्या वाढली. घरांच्या किंमती वाढल्या. खरेदीदार तयार झाले नाहीत. त्यामुळे बांधकाम क्षेत्राचा कृत्रिम फुगवटा फुटला. याचा फटका त्यांना कर्ज देणाऱ्या बँका आणि पतसंस्थांना बसला. त्यामुळे त्या देखील अडचणीत आल्या. पर्यायाने देशाची अर्थव्यवस्था धोक्यात येऊन मंदी आली. या प्रकारची उदारणे देखील जगाने मागच्या काही वर्षात अनुभवली आहेत

देशातील राजकारण : आर्थिक मंदीनंतर होणाऱ्या निवडणुकांमध्ये अनेकदा सत्तांतर होते. देशाला विकासाचे, आर्थिक शिस्तीचे आणि रोजगार निर्मितीचे स्वप्न दाखवणाऱ्या नेत्यांच्या हातात सत्ता येते. हे नेते निवडणूक प्रचारात जी आश्वासनं देतात त्याची अंमलबजावणी कशी होते यावरही देशाची पुढची आर्थिक वाटचाल अवलंबून असते.

उत्पादक कारखाण्यांचे महत्व – उत्पादनक्षमता वाढवणे हा कोणत्याही अर्थव्यवस्थेचा मुख्य गाभा आहे. त्यासाठी देशात कारखाण्यांची संख्या वाढली पाहिजे. उत्पादनक्षमता वाढली तरच निर्यात वाढेल. निर्यात वाढली तर अर्थव्यवस्था मजबूत होईल. चीन हे याचे मुख्य उदाहण आहे.

देशातील अब्जाधीशांची विचारसरणी – देशातील अब्जाधीशांचा प्रकार हा देखील अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा घटक असतो. अब्जाधीश हे रोजगार निर्मिती करणारे आणि उत्पादन क्षमता वाढवणारे असतील तर त्याचा फायदा हा अर्थव्यवस्थेला होतो. ज्या देशात खाण, खनिज तेल, बांधकाम व्यवसाय यासारख्या सरकारी कृपाछत्रांखाली वाढणाऱ्या अब्जाधीशांची संख्या मोठी त्या देशातील अब्जाधीशांचा देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होत नाही. सरकारशी जुळवून घेऊन या कंपन्यांचे भले होते. सरकारी धोरण फिरले, जागतिक अर्थव्यवस्थेत बदल झाले की या कंपन्यांचे भाव कोसळतात. याचा फटका या कंपन्यांवर अबलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेला होतो. देशात मंदी येऊ शकते.

महागाई आणि जीडीपी दर – देशातील जीवनावश्यक अन्नधान्यांच्या किंमती नियंत्रणात आहेत का? हा देखील अर्थव्यवस्थेतील महत्वाचा घटक आहे. कांद्याच्या दरामुळे 1990 च्या दशकात दिल्लीतील भाजप सरकार कोसळले होते. महागाई हा आजही देशातील कोणत्याही निवडणुकांमधला, सत्ताबदलाचा महत्वाचा मुद्दा असतो. जगातील वेगवेवेगळ्या क्रांतीचे कारण हे जीवनवाश्यक वस्तूंचे वाढलेले दर हे आहे.

भौगौलिक रचना, शहरांची वाढ – देशातील किंवा एखाद्या प्रदेशातील विकासप्रकल्प ही फक्त काही शहरांमध्येच केंद्रीत झाली आहेत का ? हे देखील देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती मोजण्याचे महत्वाचे एकक आहे. भौगोलिक स्थान, दळणवळणाच्या जलद सोयी, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती हे शहरांच्या औद्योगिक विकासातील महत्वाचे घटक आहेत. कोरोना व्हायरसच्या काळात दाट लोकसंख्येची शहर राहण्यास असुरक्षित आहेत, हे समोर आले आहे. याचा परिणाम त्या शहरातील गुंतवणुकीवर विशेषत: विदेशी गुंतवणुकीवर होण्याची शक्यता आहे. एकाच शहरावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असणे हे अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असून मंदीचे एक कारण आहे.

बाजारात आर्थिक मंदी असो वा कोणतीही परिस्थिती. तुमचा व्यवसाय सुरू राहणार म्हणजे राहणार. कारण आपण खास मंदीरोधक असे 5 व्यवसाय जाणून घ्या.

1. स्वीटस शॉप

आपण खाण्यासाठी जगणारी माणसे आहोत, लोक खायचे कधीच सोडू शकत नाही. त्यात अनेक लोक फुडी असतात, कप केक, चॉकलेट, donuts, ब्राऊनी असे अनेक गोड पदार्थ बाजारात आहेत ज्याची मागणी बाकी पदार्थांच्या तुलनेत जास्त आहे. तुम्ही पाहिले असेल, सोशल मीडियावर कुणी काही नवीन पदार्थ खात असेल तर खाण्याआधी पोस्ट नाहीतर स्टोरी असते, मग त्याची डिमांड वाढत जाते. तसे तुम्ही देखील, बेकर्स, स्वीटसचे बीजनेस करू शकता, जेणेकरून मंदीचा फटका तुमच्या व्यवसायाला बसणार नाही. कारण चमचमीत खाणे फूडी काही सोडणार नाहीत. भारतात १९०० च्या काळात आलेल्या आर्थिक मंदीत गोड पदार्थांचा व्यवसाय वाढला. अमेरिकेत देखील आर्थिक मंदी आली होती तेव्हा यात स्निकर, कॅडबरी, नेसले, हर्श्ये अश्या स्वीट बनविणाऱ्या पदार्थांना जास्त फायदा झाला.

2. किराणा दुकाने

आधी सांगितल्या प्रमाणे खाण्यासंबधीत असलेला प्रत्येक व्यापार, बीजनेस कधीच तोट्यात जात नाही. कारण शेवटी प्रश्न पोटाचा असतो. २०१५ पासून ते आतापर्यंतची आकडेवारी पाहिली तर २०१५ मद्ये ६४० बिलियन डॉलर्स अशी त्याची उलाढाल होती. मात्र आता ती ६८० बिलियन डॉलर्सच्या पुढे गेली आहे. किराणा दुकान हे अत्यावश्यक सेवेत येते, त्यामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थितीत उद्भवली तरी त्याचा फटका हा किराणा दुकांना बसत नाही. ग्राहकांची नेमकी गरज ओळखत तुम्ही किराणा दुकानांपासून अनेक व्यवसाय उत्पादित करू शकतात.

3. स्वच्छता सेवा

स्वच्छता हा सगळ्याच्या अगोदर येणारा मुद्दा असतो. देशात कोणतेही संकट आले तरी, स्वच्छता करणाऱ्यांचा व्यवसाय कधीही बंद पडला नाही. उलटा मागणी वाढत गेली. कारण स्वच्छ कार्यालय हे अधिक उत्पादनक्षम कार्यक्षेत्र असते. दरवर्षी ५५% स्वच्छता करणाऱ्या कंपन्या तोट्यात जातात कारण त्या चांगली सर्व्हिस देऊ शकले नाही. या व्यवसायात तुमची चांगली सर्व्हिस तुम्हाला बक्कळ बीजनेस वाढवून देऊ शकते. आता कोरोणाचे उदाहरण घ्या, देशभरात संकट आले यात स्वच्छता महत्त्वाचा विषय बनला आणि स्वच्छता सेवा देणाऱ्या कंपन्यांची मागणी आली. मग तुमची यात सरकारी कामे, घरगुती कामे, व्यवसायिक बिजनेसची कामे घेऊ शकता.

4. चाइल्ड केअर सेंटर्स

सर्वाधिक काळजीचे आणि सर्वाधिक बिजनेस असलेला व्यवसाय म्हणजे चाइल्ड केअर बिजनेस. त्यात पाळणा घर, लहान मुलांची खेळणी घर, ॲक्टिविटी, चाइल्ड केअर स्कूल्स असे अनेक प्रकार यात येतात. आजकाल महिलांच्या कामांचे प्रमाण वाढले आहे. त्यात काम पाहून त्यांच्या मुलांचा सांभाळ करणे अशक्य होते, त्यामुळे अशा अनेक महिला आहेत ज्या चाइल्ड केअरच्या शोधत असतात. National Centers for education statistics NCES च्या सर्वेक्षणानुसार १९९९ मध्ये ८५०,००० मुलांचे प्रमाण होते जे चाइल्ड केअर मध्ये असतात. आता तीच संख्या पाहिली तर २.५ मिलियन झाली आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की, वेळेनुसार या बिजनेस ची मागणी किती वाढणार आहे.

5. थ्रीफ्ट दुकाने

सगळ्यात सोपा उपाय आणि कुणीही करू शकतो असा बिजनेस म्हणजे थ्रीफ्ट दुकाने. दुकानांतून उरलेल्या वस्तूंना नवीन जीवन देण्याचा एक मार्ग म्हणजे थ्रीफ्ट दुकाने. सध्या भाषेत बोलायचं तर सेकंड हॅण्ड वस्तू. कारण लोक सेम वस्तू किरकोळ दुकानात घेण्यापेक्षा किफायतशीर दुकानात घेणे जास्त पसंद करतात. देशात ७० टक्के लोक सामान्य राहणीमानात जगतात. त्यामुळे कमी खर्चात वस्तू मिळवणे हे कुणाला नाही आवडणार. पुस्तके, स्टेशनरी, भांडी, शो केस वस्तू, दागिने अशा अनेक गोष्टी किफायतशीर दुकानात मिळतात. कमी पैशात वस्तू मिळते त्यामुळे लोकांचा कल वाढतो. आणि खरेदी विक्री सुरू राहते, ज्याने तुमचा बिजनेस वाढत राहतो. त्यामुळे किफायतशीर दुकाने हा देखील बिजनेस मोठा चालणारा आहे, आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असा असल्याने कोणत्याही आर्थिक मंदीची झळ त्याला बसणार नाही.