नवी दिल्ली | 26 February 2024 : कृत्रिम बुद्धीमत्तेवरुन (Artificial Intelligence) सध्या जगभरात घमासान सुरु आहे. अनेकांना या नवीन तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या जाण्याची भीती सतावत आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण TV9 च्या वार्षिक संमेलन व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या दुसऱ्या दिवशी हा केवळ भ्रम असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. सामिक रॉय यांनी TV9 शी बोलताना हा मुद्दा फेटाळला.आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे भविष्यात नोकऱ्या जाण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले.
TV9 च्या वार्षिक संमेलन व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या दुसऱ्या दिवशी AI: वचन आणि संकटे या विषयावर सॅमसंग रिसर्चच्या AI व्हिजनचे संचालक अशोक शुक्ला, स्टॅनफोर्ड प्रो. बायोटेक, AI मध्ये स्पेशलायझिंग प्रा.अनुराग मायरा, रिलायन्स जिओच्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन एआय/एमएलचे चीफ डेटा सायंटिस्ट शैलेश कुमार आणि मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या कॉर्पोरेट, मध्यम आणि लघु व्यवसायचे कार्यकारी संचालक समिक रॉय यांनी सहभाग घेतला.
AI मुळे नाही जाणार नोकऱ्या
मायक्रोसॉफ्ट इंडियाचे सामिक रॉय यांनी एआयचा परिणाम काय होईल हे विषद केले. AI भविष्यातील नोकऱ्यांसाठी लवचिक आहे. त्यामुळे नोकरी गमाविण्याचा कोणतीच भीती नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी याविषयीवर बोलताना, AI मुळे भविष्यात नोकरी जाणार नसल्याचे सांगितले.
काय म्हणाले मायक्रोसॉफ्टचे सामिक रॉय?
मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या कॉर्पोरेट, मध्यम आणि लघु व्यवसायचे कार्यकरी संचालक यांनी एआयचा फायदा काय, हे सांगितले. एआय हे लोकांच्या कौशल्यवृद्धीसाठी असल्याचे सांगितले. जगभरात अनेक एप्लिकेशन सध्या उपलब्ध आहेत. पण जेव्हा पण नोकरी तयार करणे अथवा देण्याची वेळ येते, तेव्हा थोडे मागे जाऊयात. वीजेची सुरुवात, स्टीम इंजिन आणि कम्प्युटर. या सगळ्यांनी जग बदलवले आहे. या गोष्टी जगासाठी नवीन होत्या, पण त्यांनी लोकांच्या हाताला काम दिले. नोकऱ्या दिल्या, असे ते म्हणाले.
भारतात संगणक आल्याने देशात आयटी कंपन्या आल्या. ऑनलाईन ट्रेंडिंग सुरु झाले. त्यामुळे नोकऱ्या वाढल्या. त्यामुळे आता आलेल्या आर्टिफिशिअल तंत्रज्ञान शिकून कौशल्य वृद्धी करणे गरजेचे आहे. एआयमुळे नोकऱ्या जाणार नाही. पण लोकांना हे कसब शिकून घ्यावं लागेल. त्यांना एआय स्वीकारावं लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.