नवी दिल्ली | 25 February 2024 : भारताचे ऑटो सेक्टर झपाट्याने बदलत आहे. ऑटो सेक्टरमध्ये मोठी कलाटणी येण्यासाठी त्यात मारुती सुझुकी इंडिया मोठी भूमिका निभावणार आहे. देशाचे ऑटो सेक्टर तेजीने इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे वळत आहे. इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. टाटा मोटर्सने त्यात हनुमान उडी घेतलेली असताना मारुतीने मात्र सध्या चार हात लांब राहणेच पसंत केले आहे. कंपनी इलेक्ट्रिक ऐवजी हायब्रिड कारवर अधिक लक्ष देत आहे. यामागे कंपनीचे काही खास धोरण आहे का? तुमच्या मनातील या प्रश्नांची उत्तरे, देशातील क्रमांक 1 न्यूज नेटवर्क TV9 च्या What India Thinks Today संमेलनात याची उत्तरे मिळतील. मारुती सुझुकीचे चेअरमन आर. सी भार्गव आणि महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे सीईओ अनिष शाह यांच्याकडून बदलत्या ऑटो इंडस्ट्रीविषयी जाणून घेऊयात..
मारुती सुझुकी इंडिया आणि आर. सी. भार्गव हे नाव देशात आता एकमेकांना पुरक ठरले आहेत. या खास कार्यक्रमात ते मारुती आणि देशातील ऑटो सेक्टरविषयी विचार मांडतील. तर महिंद्रा अँड महिंद्राचे अनिष शाह हे कंपनीच्या पोर्टफोलिओतील बदलाची चर्चा करतील. भविष्यातील कंपनीच्या धोरणांचा, रणनीतीचा ऊहापोह करतील. इलेक्ट्रिक वाहनाविषयी मत व्यक्त करतील.
आर. सी. भार्गव
मारुती सुझुकीचे सध्याचे चेअरमन आणि माजी सीईओ आर. सी. भार्गव हे, त्या उद्योजकांपैकी एक आहे, ज्यांच्या कार्यकाळात मारुतीने मोठा टप्पा गाठला. भारतीय प्रशासकीय सेवेचा त्यांना जवळपास 25 वर्षांचा अनुभव आहे. तर मारुतीच्या शीर्ष फळीत असणाऱ्या काही जणात त्यांचा समावेश होतो. जवळपास 90 व्या वर्षी सुद्धा त्यांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. त्यांनी दून स्कूल, अलाहाबाद विद्यापीठ आणि मॅसाच्युसेट्सच्या विलियम कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे. WITT 2024 मध्ये ‘सस्टेनिंग द मोमेंट अँड द मोमेंटम’ सारख्या सत्रात त्यांनी विचार मांडले आहेत.
डॉक्टर अनिष शाह
महिंद्रा अँड महिंद्रा या मोठ्या ऑटो कंपनीचे सीईओ आणि एमडी अनिष शाह पण या कार्यक्रमात त्यांचे विचार मांडतील. त्यांच्या सत्रात ऑटो सेक्टरमधील वाढती मागणी, महिंद्राची भविष्यातील योजना आणि इलेक्ट्रिक व्हेईकलचे भविष्य यावर चर्चा होईल. महिंद्रा अँड महिंद्रामध्ये येण्यापूर्वी शाह हे जीई कॅपिटल इंडियाच्या सीईओ पदी होते. शाह यांनी बँक ऑफ अमेरिकाच्या युएस डेबिट प्रोडक्ट्स, मुंबईमध्ये सिटी बँक आणि बोस्टनमध्ये बेन अँड कंपनीत सुद्धा काम केले आहे. ते फिक्कीचे अध्यक्ष पण होते.