आता तुमचं गाडी चालवण्याचे कौशल्य तुम्हाला फायदा मिळवून देईल. तुम्ही बेदाकरपणे गाडी पळविता की नियमांचं पालन करुन सुरक्षित वाहन हाकता, यावर तुमच्या विम्याचा हप्ता कमी जास्त होईल. आता तुम्ही म्हणाल हा काय नवीन फंडा? तर हा नवीन नियम सरकारने काढला आहे. भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (IRDAI) पे अॅज यू ड्राईव्ह (Pay As You Drive) आणि पे हाऊ यू ड्राईव्ह (Pay how you drive) या दोन योजना आणल्या आहेत. टेलिमॅटिक्सवर आधारीत मोटार वाहन विमा संरक्षणास आयआरडीएआयने मंजूरी दिली आहे. त्यामुळे वाहनचालकाला त्याच्या वाहन कौशल्यावर विमा रक्कम कमी जास्त करता येईल. ही योजना दुचाकी आणि चारचाकी (Two and Four Wheeler) गाड्यांसाठी लागू आहे. तुम्ही या सेवा विकत घेऊ शकता. त्याआधारे तुम्हाला पुढील विम्याचा हप्ता कमी करता येईल. त्यासाठी विमा पॉलिसीत तुम्हाला अॅड ऑन जोडवे लागणार आहे. तरच ही सेवा मिळेल.
फ्लोटर मोटार विमा पॉलिसीचा हप्ता सामान्य विमा पॉलिसीपेक्षा अधिक आहे. ही सुविधा जोडण्यासाठी वाहनधारकाला जास्त रक्कम मोजावी लागेल. परंतू, ही सुविधा घेतल्यास अनेक पॉलिसी घेण्याच्या फे-यातून ग्राहकाची सूटका होईल. इर्डा या विमा नियंत्रकाने विमा कंपन्यांना 3 नवे अॅड ऑन जोडण्याची परवानगी दिली आहे. पे अॅज यू ड्राईव्ह आणि पे हाऊ यू ड्राईव्ह म्हणजे तुम्ही जशी गाडी चालवाल तसा विमा हप्ता तर जशी गाडी चालवाल तसा विम्याचा हप्ता या दोन सुविधा ग्राहकांना या अॅड ऑन मुळे प्राप्त होतील. नियमीत वाहन चालवणा-या अथवा ज्यांच्याकडे एकाहून अधिक वाहने आहेत,अशा वाहनधारकांना या नियमांचा मोठा फायदा होणार आहे.
वर्षभरात ग्राहकाने विमा रक्कमेवर कोणताही दावा अथवा नुकसान भरपाई मागितली नाही तर नो क्लेम बोनसाचा त्याला फायदा मिळू शकेल. हा नो क्लेम बोनस ग्राहकाला 20 टक्क्यांपासून सुरु होईल. त्यामुळे पुढील विमा हप्त्याच्यावेळी ग्राहकाला कमी रक्कम मोजावी लागेल. त्याला हप्त्यात सूट मिळेल. गाडीला किरकोळ खर्च लागत असल्यास अथवा किरकोळ नुकसान झाल्यास ते विम्यातून भरून काढण्याच्या फंदात पडू नका. त्यामुळे तुम्ही नो क्लेम बोनस योजनेचा फायदा मिळवू शकत नाही. तसेच नो क्लेम बोनससाठी तुम्ही अपात्र ठराल.