नई दिल्ली : देशातील दिग्गज उद्योगपती आणि आशियातील श्रीमंतांपैकी एक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या व्यवसाय संपूर्ण जगात पसरलेला आहे. अंबानी कुटुंबियांना सर्वच ओळखतात. रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industry) साम्राज्य जगभर पसरलेले आहे. मुकेश अंबानी, त्यांची पत्नी, मुले, त्यांचा भाऊ अनिल अंबानी, त्यांची पत्नी, मुलं यांना सर्वच जण ओळखतात. पण त्यांच्या दोन बहिणींना फारच कमी लोक ओळखतात. त्यांच्या बहिणीविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांच्या दोन्ही बहिणी प्रसिद्धीपासून दूर आहेत. त्या मीडियापासून दूर राहतात. नीना कोठारी (Nina Kothari) आणि दुसरी बहिणी दीप्ती साळगावकर (Deepti Salgaonkar) यांना फार कमी लोक ओळखतात. त्या बिझिनेस टायकून धीरुभाई अंबानी यांच्या मुली आहेत.
मीडिया अहवालानुसार, नीना कोठारी (Nina Kothari) यांनी वर्ष 2003 मध्ये एक कॉफी आणि फुड चेनची स्थापना केली होती. मुकेश अंबानी यांच्या बहिणीविषयी फारशी माहिती समोर येत नाही. नीना कोठारी या यशस्वी उद्योजिका आहेत. त्यांची एकूण संपत्ती कोट्यवधींच्या (Net Worth) घरात आहे. विविध व्यवसायाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.
नीना कोठारी या मुकेश अंबानी यांची बहिण आहे. मीडियापासून दूर असल्याने त्यांचे फोटोही फारसे नाहीत. पण त्या वहिनी नीता अंबानी यांच्या लाडक्या आहेत. टीना अंबानी यांच्याशी ही त्यांचे चांगले संबंध आहेत. दोन्ही भावांच्या या दोन्ही बहिणी अत्यंत लाडक्या आहेत. दीप्ती साळगावकर या गोव्यात स्थायिक झालेल्या आहेत. त्यांनी राज साळगावकर यांच्याशी प्रेम विवाह केला आहे. त्यांच्या मुलीचे लग्न नीरव मोदीच्या भावाशी झालेले आहे.
नीना कोठारी यांनी 1986 मध्ये व्यवसायिक भद्रश्याम कोठारी यांच्यासोबत लग्न केलेले आहेत. कॅन्सरशी सामना करताना 2015 मध्ये त्यांना मृत्यूने ओढून नेले. तरीही नीना कोठारी डगमगल्या नाहीत. त्यांनी हिंमत्तीने सर्व कारभाराची सूत्रं हाती घेतली. त्यांची संपत्ती कोट्यवधीत आहे. पण ती किती आहे, हे अजून स्पष्ट नाही.
मीडिया रिपोर्टस नुसार, नीना कोठारी यांनी पतीच्या निधनानंतर, त्यांच्या व्यवसायाची जबाबदारी सांभाळली. कोठारी शुगर्स ॲंड केमिकल्सची सूत्र त्यांनी हातात घेतली. दक्षिण भारतात एच सी कोठारी हे मोठे नाव आहे. त्यांच्या कंपनीचे अनेक उद्योग आहेत. यामध्ये कोठारी पेट्रोकेमिकल्स आणि कोठारी सेफ डिपॉझिट लिमिटेड कंपन्यांचा समावेश आहे. त्या सध्या कोठारी शुगर मिल्सच्या मालकीण आहेत. त्यामुळे भारतातील शक्तीशाली महिलांच्या यादीत त्यांचे नाव आहे.