नवी दिल्ली | 13 March 2024 : जगातील मौल्यवान हिरा कोहिनूरचा (Kohinoor) विषय निघाला की, भारतातील अनेकांची उत्सुकता ताणल्या जाते. कोहिनूर ब्रिटिशांकडून परत आणण्याच्या अनेकदा घोषणा झाल्या. त्याविषयीचे राजकारण झाले. पण कोहिनूर अद्यापही ब्रिटिशांच्या ताब्यात आहेत. मोदी सरकारच्या काळात कोहिनूर परत आणण्यात येऊ शकतो, अशी नागरिकांची आशा आहे. मोदी सरकार त्यासाठी इंग्लंडच्या सरकारसोबत वस्तू हस्तांतरण मोहिम प्रभावीपणे राबविण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीपासूनच त्यासाठी केंद्र सरकारने तयारी केली आहे. मोदी सरकारची कुटनीती कदाचित कामाला येऊ शकते, असा दावा द डेली टेलीग्राफने केलेला आहे.
भारताच्या 52 हजार वस्तू
ब्रिटिश म्युझियमच्या ऑनलाईन डेटाबेसवर नजर टाकल्यास याठिकाणी जगभरातील बेशकिंमती वस्तू असल्याचे समोर आले आहे. 212 देशातील जवळपास 22 लाख वस्तू संग्रहालयात आहे. तर भारतातील इतिहासाची ओळख असणाऱ्या 52,518 वस्तूंचा यात समावेश असल्याचे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे पूर्व अध्यक्ष नजीब शाह यांनी स्पष्ट केले आहे.
ही आहे अडचण
ब्रिटिश म्युझियममधून वस्तू देशात आणण्यासाठी जागतिकस्तरावर UNIDROIT कन्वेंशन स्वीकारण्यात आले आहे. 1995 मध्ये त्याची सुरुवात झाली आहे. त्यानुसार, चोरी आणि अवैध रुपाने निर्यात करण्यात आलेल्या सांस्कृतिक वस्तू परत करण्याचा करार करण्यात येऊ शकतो. तर UN Resolution 2021 हा पण एक कायदा आहे. पण इंग्लंड सरकार या कराराच्या बाहेर असल्याचा दावा करण्यात येतो.
मोदी सरकारची कुटनीती
मोदी सरकारची कुटनीती दिसून आली आहे. राजकीय माध्यमातून, दबावातून हा प्रश्न लवकर सुटण्याची शक्यता आहे. काही दिवसांत केंद्र सरकारने ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि सिंगापूर येथून 357 पुरातन वस्तू परत आणण्यात आल्या आहेत. कोहिनूर बाबत पण हेच धोरण राबविण्याची मागणी होत आहे.
105 कॅरेटचा हिरा
कोहिनूर या शब्दाचा अर्थ पारशीमध्ये कोह-ए-नूर असा होता. म्हणजे प्रकाशाचा पर्वत. महाराजा रणजीत सिंह यांच्या खजिन्यात हा अमूल्य हिरा ईस्ट इंडिया कंपनीच्या हाथी लागला. हा जवळपास 105 कॅरेटचा हिरा त्यापूर्वी अनेक भारतीय शासकांकडे होता. भारतीय सांस्कृतिक मंत्रालयाने पुरातन वस्तू परत आणण्यासाठी मोठी योजना आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.