Petrol Diesel Price Today : पंधरा दिवसानंतर अखेर कच्चा तेलाने नांगी टाकली. अक्षय तृतीयेचा मुहूर्तापूर्वीच तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याने तेल विपणन कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला.
Ad
आजचा ताजा भाव
Follow us on
नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाची (Crude Oil) घसरगुंडी उडाली. तेल कंपन्यांना या घडामोडींचा मोठा फायदा होणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून क्रूड ऑईलने जवळपास 90 डॉलर प्रति बॅरलपर्यंत मजल मारली होती. ओपेक प्लस देशांनी कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्याची घोषणा केली. त्याचे परिणाम लागलीच दिसू लागेल. कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली. पण आता कच्चा तेलाने आता स्वस्ताईची आनंदवार्ता आणली आहे. आज सकाळीच पेट्रोलियम कंपन्यांनी भाव जाहीर केले. आज तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव(Petrol-Diesel Price) काय आहे.
कच्चा तेलाचा भाव काय
आज कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलमध्ये (WTI Crude Oil) मोठी घसरण होऊन आज हा भाव 77.29 डॉलर प्रति बॅरल तर ब्रेंट क्रूड ऑईलमध्ये (Brent Crude Oil) घसरण झाली. हा भाव 80.89 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली उतरला.