सुमारे 18 महिने शांत बसल्यानंतर हिंडेनबर्ग या अमेरिकी गुंतवणूकदार कंपनीने नवीन आरोप केले आहेत.आता हिंडेनबर्ग यांनी थेट सेबीच्या प्रमुख माधबी पुरी-बुच यांच्यावर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर गंभीर आरोप केल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाने माधवी पुरी चर्चेत आल्या आहेत. त्या सेबी सारख्या संस्थेवर नियुक्त झालेल्या पहिल्याच खाजगी क्षेत्रातील व्यक्ती आहेत. यापूर्वी सेबीची सर्व अधिकारी हे सरकारी सेवेतील होते.
उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर आरोप केल्यानंतर शांत बसलेल्या अमेरिकन गुंतवणूकदार कंपनी हिंडेनबर्गने आता सेबी प्रमुख माधबी पुरी यांना घेरत संशयाचे धुके निर्माण केले आहे. हिंडनबर्ग आरोप केला आहे की माधबी यांनी सेबीच्या प्रमुख असताना देखील सिंगापूरच्या ऑफशोअर ऑफशोर कंसल्टिंग फर्मचा मालकी हक्क आपल्या पतीकडे सोपविला. आणि खाजगी ईमेलद्वारे ऑफशोअर फंडला मॅनेज केले. माधवी यांनी अदानी प्रकरणात कारवाईस उशीर केल्याने त्यांच्या पतीला सिनियर एडव्हायझर म्हणून लाभ मिळाल्याचाही आरोप हिंडेनबर्ग यांनी केला आहे.
हिंडेनबर्ग यांनी म्हटले की माधवी पुरी बुच यांची सेबीच्या प्रमुख असताना त्यांना मिळालेल्या वेतनापेक्षा त्यांची कमाई जादा असून त्यांनी या पदावर असताना कंसल्टींग फर्म अगोरा एडवायजरीमध्ये भागीदारी कायम राखली आहे. माधवी आणि त्यांचे पती यांची एकूण संपत्ती सुमारे 83 कोटी रुपये आहे. तर सेबीच्या अधिकृत वेबसाईटवर त्यांची ग्रॉस सॅलरी 3,19,500 रुपये दर्शविली आहे.