मुंबई : महागाई वाढत असताना इंधनाचे दर (Price) सातत्याने वाढत असल्याचं दिसतंय. यामुळे सर्वसामन्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. आजचे पेट्रोल (Petrol)आणि डिझेलचे (Diesel) दर जाहीर करण्यात आले आहेत. आजही दरात कोणताही बदल झालेला नाही. महागड्या कच्च्या तेलापासून दिलासा मिळण्यासाठी रशियाकडून आयात दुप्पट करण्याचा विचार केला जातोय. युक्रेन संकटामुळे रशियन तेलावरील बंदी वाढवली जात आहे. अशा परिस्थितीत स्वस्त दरात कच्चे तल रशियाकडून मिळत आहे. भारतीय तेल कंपन्या ही ऑफर नाकारू इच्छित नाहीत. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, रिलान्स इंडस्ट्रीज, नायरा एनर्जी या कंपन्या रशियाकडून तेल आयात वाढवण्याच्या दिशेनं वेगानं पाऊल उचलंत असल्याचं दिसतंय. त्यामुळे येत्या काळात इंधन दरांमध्ये मोठा फरक पडू शकतो.
घरातून बाहेर पडताना गरजेच्या वस्तूंच्या किंमती माहित असाव्यात असं नेहमी म्हटलं जातं. आपण घरातून बाहेर पडताना दुचाकीवर किंवा चार चाकीवर जात असू तर आपल्याला इंधनाचे दर माहितच असायला हवेत. आम्ही तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलचे दर सांगणार आहोत. यामुळे बाहेर पडताना तुमची देखील गौरसोय होणार नाही. इंधनाचे दर माहित झाल्यास कोणतीही फसवणूक न होता अंदाजही बांधता येईल.
शहर | पेट्रोलचे दर ( प्रति लिटर) | डिझेलचे दर (प्रति लिटर) |
---|---|---|
दिल्ली | 96.72 रु. | 89.62 रु. |
मुंबई | 111.35 रु. | 97.28 रु. |
नागपूर | 111.38 रु. | 95.88 रु. |
नाशिक | 111.39 रु. | 95.86 रु. |
पुणे | 111.04 रु. | 95.52 रु. |
ठाणे | 110.77 रु. | 95.24 रु. |
कोल्हापूर | 111.72 रु. | 96.21 रु. |
दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 96.72 रुपये आहे. डिझेलचा दर 89.62 प्रति लिटर इतका आहे. मुंबईमध्ये आज एक लीटर पेट्रोलचा दर 111.35 इतका आहे.तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रति लिटर इतका आहे. तर दुसरीकडे इतर मोठ्या शहरांमधील इंधनाचे दर पाहिल्यास चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 इतका आहे. तर डिझेलचा दर 102.63 रुपये प्रति लिटर इतका आहे. कोलकात्यामध्ये पेट्रोलचा दर 106.03 इतका आहे. तर डिझेलचा दर 92.76 रुपये इतका आहे.