मुंबई : पेटीएम(Paytm) आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्वपूर्ण भाग बनले आहे. पैसे ट्रन्सफर करण्यापासून बिल पेमेंट करण्यापर्यंत पेटीएम व्यवहारासाठी एक महत्वाचे साधन बनले आहे. छोट्या दुकानदारांपासून ते मोठ्या शोरुमपर्यंत प्रत्येक जण पेटीएमचा सर्वाधिक वापर करीत आहे. असे व्यवहार करताना अनेकदा काही तांत्रिक कारणामुळे तुमचे पेमेंट अडकते किंवा दुसऱ्याच अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर होतात. कधी कधी आपण एखादे बिल पेमेंट करतो. आपल्या अकाऊंटमधून पैसे कट होतात. मात्र आपले पेमेंट झालेलेच नसते. असे झाल्यास घाबरण्याचे बिलकुल कारण नाही. जाणून घ्या पैसे कसे मिळतील रिटर्न. (What to do if money goes from Paytm to wrong account)
पेटीएम पॉलिसीनुसार एकदा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर केले की तुम्ही ते पैसे रिटर्न घेण्यासाठी पेटीएमकडे अधिकृत दावा करु शकत नाही. म्हणजे जर तुम्ही चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले तर यात कंपनी तुम्हाला काहीच मदत करु शकत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कंपनीकडे दावा करु शकत नाही. ज्या व्यक्तीच्या खात्यात ते पैसे गेले आहेत तीच व्यक्ती ते पैसे रिटर्न देऊ शकते. तुम्हाला स्वतःलाच त्या संबंधित व्यक्तीला संपर्क साधून पैसे रिटर्न करण्याची विनंती करावी लागेल. संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी प्राप्तकर्ता बँकेकडून सदर व्यक्तीची माहिती मिळवून संपर्क करु शकता.
जर आपण त्या संबंधित व्यक्तीशी संपर्क साधू शकत नसाल तर तुम्ही 24×7 हेल्पच्या माध्यमातून पेटीएम कस्टमर सर्व्हिसशी संपर्क करा. त्यानंतर पेटीएम ज्या व्यक्तीच्या खात्यात पैसे गेले आहेत त्या व्यक्तीला केवळ विनंती करु शकते. पैसे प्राप्त झालेल्या व्यक्तीचेही पेटीएमवर अकाऊंट असेल तर पेटीएमही त्यांच्यासोबत असे करु शकते. मात्र यासाठी सक्ती नाही. पैसे प्राप्त केलेल्या व्यक्तीचे पेटीएमवर अकाऊंट नसेल तर पेटीएम त्या व्यक्तीचे खाते असलेल्या बँकेकडे बातचीत करु शकते. जर बँकेने सहमती दिली तर ती रक्कम तात्काळ तुमच्या खात्यात जमा केली जाईल. मात्र जर संबंधित बँकेने सहमती दिली नाही तर पैसे परत मिळवण्यासाठी तुमच्याकडे कायदेशीर किंवा पॉलिसी सहायता पर्याय अवलंबण्याशिवाय पर्याय नाही. (What to do if money goes from Paytm to wrong account)
MHADA lottery 2020-2021 : म्हाडाच्या घरांची लॉटरी, विजेत्यांची नावं उद्या जाहीर होणार https://t.co/NYYaWUwP6m @Awhadspeaks @Ksbsunil
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 10, 2021
इतर बातम्या
सावधान ! 11 बँकांतून पावणेसात लाखांच्या नकली नोटा जप्त
दरमहा 10 हजारांची बचत; 16 लाखांचा फायदा, पोस्टाची जबरदस्त योजना