नवी दिल्ली : जोरदार आगेकूच करणाऱ्या कंपन्यांमध्ये मिडकॅप म्युच्युअल फंड गुंतवणूक करतात. या फंडमध्ये स्मॉलकॅप फंडच्या तुलनेत जोखीम कमी असते. तर रिटर्न पण तगडा मिळतो. दीर्घ कालावधीसाठी तुम्हाला चांगला परतावा हवा असेल, श्रीमंत व्हायचे असेल तर मिडकॅप फंड्स (Midcap Funds) हा चांगला पर्याय ठरु शकतो. अर्थतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, मिडकॅप फंडमध्ये कमीत कमी पाच वर्षे गुंतवणूक करणे आवश्यक आहे. मिडकॅप फंडमध्ये 500 रुपये गुंतवल्यास किती फायदा होईल? तुम्हाला श्रीमंत होता येईल का?
Quant Mid Cap Fund
म्युच्युअल फंडात गुंतवणूकीसाठी SIP हा सर्वोत्तम पर्याय आहे .या फंडाविषयी गुंतवणूकदारांमध्ये आकर्षण आहे. 5 वर्षांच्या कालावधीतील फंडसमध्ये Quant Mid Cap Fund ने सर्वाधिक परतावा दिला आहे. नियमीत गुंतवणूकदारांना या फंडने वार्षिक आधारावर सरासरी 18.98 आणि थेट गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 20.97 टक्क्यांचा सरासरी परतावा दिला आहे.
SIP गुंतवणूकदारांना जवळपास 25% CAGR
SIP Calculator नुसार, जर गुंतवणूकदारांनी Quant Mid Cap Fund मध्ये पाच वर्षांपूर्वी या योजनेत दररोज 500 रुपये गुंतवले असते तर पाच वर्षांत त्यांची एकूण गुंतवणूक 9 लाख रुपयांची झाली असती. आज हा फंड 16.55 लाखांचा असता. या फंडवर वार्षिक परतावा 24.66 टक्के मिळाला. नेट रिटर्न जवळपास 84 टक्के होता.
एकरक्कमी गुंतवणुकीवर जवळपास 19% CAGR
जर एखाद्या गुंतवणूकदाराने Quant Mid Cap Fund मध्ये 5 वर्षांपूर्वी एकरक्कमी 5 लाख रुपये गुंतवले असते तर आज या फंडची व्हॅल्यू जवळपास 12 लाख रुपये असते. गुंतवणूकदारांना सरासरी जवळपास 19 टक्के परतावा मिळाला असता. तर नेट रिटर्न 139 टक्के असता.
SIP गुंतवणूकदारांना सर्वाधिक रिटर्न
एसआयपी गुंतवणूकदारांना या फंडने सर्वाधिक रिटर्न दिला आहे. Quant Mid Cap Fund ने SIP गुंतवणूकदारांना सर्वाधिक रिटर्न दिला आहे. या फंडचा NAV 135.42 रुपयांचा आहे. तर या फंडची साईज 1960 कोटी रुपयांची आहे. या फंडचा NFO मार्च 2001 मध्ये आला होता. या फंडने एकरक्कमी गुंतवणूक करणाऱ्यांना 12.44 टक्क्यांचा वार्षिक परतावा दिला आहे.
मुलांच्या नावे करा गुंतवणूक
आता तुम्हाला मुलांच्या नावे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येईल. त्यासाठी नियम तयार करण्यात आला आहे. हा नियम येत्या 15 जूनपासून लागू करण्यात येत आहे. बाजार नियामक सेबीने (SEBI) म्युच्युअल फंड गुंतवणुकीविषयी हा नियम तयार केला आहे.
(डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड हा बाजारातील जोखीमेवर आधारीत आहे. मागील कामगिरीआधारे हा फंड पुढे पण तशीच कामगिरी बजावले हे सांगता येत नाही. हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारातील तज्ज्ञाचा सल्ला जरुर घ्या.)