गोव्यात राहणाऱ्या श्रद्धाच्या हातात पहिला पगार येताच तिनं एका टॅक्स सेव्हींग (Tax saving) म्युच्युअल फंडात (mutual funds) गुंतवणूक (Investment) करण्याचा निर्णय घेतला. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं सोपं आहे. गुंतवणूक ऑनलाइन किंवा एजंटच्या मार्फत देखील करता येते. म्युच्युअल फंडाबद्दल तिने अधिक माहिती घेण्यास सरुवात केली. त्यावेळी तिला दोन पर्याय दिसले. प्रत्येक फंडात तिला ग्रोथ आणि डिव्हिडंट म्हणजेच वाढ आणि लाभांश हा पर्याय दिसून येत होता. हे दोन्ही पर्याय पाहून तिचा गोंधळ आणखी वाढला. शेवटी तिनं आर्थिक सल्लागार असलेल्या हितेनची मदत घेण्याचं ठरवलं. म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. यात म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यानंतर मिळणाऱ्या उत्पनन्नाचा वापर पुन्हा त्या फंडात गुंतवणुकीसाठी करू शकतो याला ग्रोथ ऑप्शन म्हणजेच वाढीचा पर्याय असे म्हणतात. किंवा एका विशिष्ट कालावधीनंतर मिळणारे उत्पन्न काढून घेतल्यास त्याला डिव्हिडेंट ऑप्शन म्हणजेच लाभांशाचा पर्याय असे म्हणतात.
ग्रोथ ऑप्शनमध्ये एखाद्या फंडातून मिळणारा नफा पुन्हा त्याच फंडात लावला जातो. त्यामुळे कंपाऊंडिंग म्हणजेच चक्रवाढीचा फायदा मिळतो . या पद्धतीतून दीर्घकाळात चांगला पैसा जमा होतो. दुसरीकडे डिव्हिडेंट ऑप्शनमध्ये एखाद्या फंडातून नफा मिळाल्यास लाभांशाच्या रुपात गुंतवणूकदारांना वाटला जातो. तसेच डिव्हिडंड ऑप्शनमध्ये फंडातून जेव्हा नफा होतो तो डिव्हिडंडच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना दिला जातो. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून ज्यांना नियमित कमाई करायची आहे त्यांच्यासाठी डिव्हिडंड ऑप्शन चांगला असल्याचे गुंतवणूक तज्ज्ञांच मत आहे. म्युच्युअल फंडाची निवड करताना कोणत्या पर्यायाची निवड करावी हे कसं निश्चित करावं? याबद्दल गुंतवणूकदारांमध्ये नेहमी गोंधळ असतो. तुम्हाला दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायची असल्यास एका चांगल्या फंडात ग्रोथ पर्याय निवडू शकता. तर दुसरीकडे तुम्हाला नियमित उत्पन्न तुमच्या खात्यात यावं असं वाटत असल्यास डिव्हिडंटचा पर्याय निवडणे योग्य ठरते.
बाजारातील चढ-उतार आणि फंडानं गुंतवणूक केलेल्या शेअरमधील होणाऱ्या चढ उतारांमुळे इक्विटी फंडातून डिव्हिडंड मिळेल याची शाश्वती नसते. यामुळे डिव्हिडंट हवा असणारे गुंतवणूक डेट फंडाची निवड करतात. डेट फंडात नियमित रुपात डिव्हिडंट मिळतो. श्रद्धाला कोणत्या पद्धतीचा परतावा पाहिजे यानुसार तिने गुंतवणूक केली पाहिजे. तसेच तिचा दीर्घकालीन आर्थिक लक्ष काय आहे यानुसार योग्य फंडाची निवड करावी. कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना गुंतवणुकीचा उद्देश स्पष्ट असावा. उद्देश निश्चित झाल्यानंतर दुसरी पायरी म्हणजेच SIP किंवा म्युच्युअल फंडाची निवड करावी
गुंतवणूक करताना शॉर्ट टर्म, मिडियम टर्म आणि लाँग टर्मपैकी एका प्रकाराची निवड करावी. सहसा डेट फंड हे मध्यम काळासाठी आणि इक्विटी फंड्स ही दीर्घकालीन आर्थिक ध्येयासाठी उपयोगी आहेत. लहान-सहान गुंतवणुकीद्वारे एक मोठी रक्कम मिळावी हा आपला मुख्य उद्देश असल्यास त्यासाठी ग्रोथ फंड हा योग्य पर्याय आहे. दुसरीकडे डिव्हिडंड ऑप्शनमध्ये NAV कमी होत असल्यानं दीर्घकाळात तुमची संपत्ती वाढत नाही.
यासोबतच टॅक्सच्या परिणामकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. म्युच्युअल फंडातील पर्यायाच्या निवडीनंतर टॅक्सचा काय परिणाम होतो याकडे लक्ष द्यावं. डिव्हिडंड आणि ग्रोथ या पर्यायांमध्ये टॅक्समध्येही खूप तफावत आहे. डिव्हिडंडचा पर्याय निवडल्यानंतर गुंतवणूकदारांला इक्विटी आणि डेट फंडात आपल्या इन्कम टॅक्स स्लॅब नुसार टॅक्स द्यावा लागतो. दुसरीकडे ग्रोथ पर्यायामध्ये शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो. तुम्ही म्युच्युअल फंडातून कीती पैसे काढून घेतले यानुसार कर भरावा लागतो.