टाटा समूहाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात झोकून दिलेले ‘सर रतन’ माहितीयत का?

| Updated on: Aug 10, 2021 | 12:06 AM

सर रतन टाटांना टाटा समूहातील सामाजिक कार्यात वाहून घेतलेले रतन म्हटले जाते. ते जमशेदजी टाटांचे छोटे पुत्र आणि नवल टाटा यांचे वडील होते. म्हणजेच सध्याचे टाटा समूहाचे चेअरमन रतन नवल टाटांचे ते आजोबा होते.

टाटा समूहाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात झोकून दिलेले सर रतन माहितीयत का?
sir ratan
Follow us on

नवी दिल्लीः रतन टाटा यांचा जगभरात नावलौकिक आहे. भारतात त्यांना मानणारा तर मोठा वर्ग आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून त्यांना भारतरत्न देण्याची मागणी जोर धरू लागलीय. पण तुम्हाला माहितीय का?, रतन टाटांचे आजोबा सर रतन टाटा (Sir Ratan Tata) मोठे समाज सुधारक होते. त्यांच्याकडून रतन टाटांना हा वारसा लाभलाय.

सामाजिक कार्यात वाहून घेतलेले रतन

सर रतन टाटांना टाटा समूहातील सामाजिक कार्यात वाहून घेतलेले रतन म्हटले जाते. ते जमशेदजी टाटांचे छोटे पुत्र आणि नवल टाटा यांचे वडील होते. म्हणजेच सध्याचे टाटा समूहाचे चेअरमन रतन नवल टाटांचे ते आजोबा होते. फार कमी वयात त्यांना जग सोडावं लागलं. त्यांनी लहान वयातच खूप उल्लेखनीय सामाजिक कार्ये केलीत. तो वसा ते मागे सोडून गेले असून, टाटा समूह त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत पुढे जातोय.

टाटा समूह उभे करण्यातील चार मोठ्या लोकांमधील ते एक

टाटा समूह उभे करण्यातील चार मोठ्या लोकांमधील ते एक आहेत. तीन इतर लोक म्हणजे जमशेदजी टाटा, दोराबजी टाटा आणि रतनजी दादाभाई टाटा आहेत. सर रतन टाटा हे रतनजी या नावानं लोकप्रिय होते. रतनजी टाटा यांचा जन्म 20 जानेवारी 1871ला झाला होता. ते दुसऱ्यांना मदत करण्यात नेहमीच पुढे असायचे. तसेच भारतातील गरिबी दूर व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांमधील एक होते. त्यांना स्वतःचं मूल नव्हतं. रतनजी टाटा यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी नवजबाई टाटा यांनी कुटुंबातीलच एक अनाथ मुलगा दत्तक घेतला. टाटा समूहाचे सध्याचे चेअरमन रतन टाटा हेसुद्धा नवल टाटा यांचे पुत्र आहेत.

सर रतनजींनी व्यवसाय वाढवला

रतनजी यांनी बॉम्बे सेंट जेव्हियर्स कॉलेजमधून शिक्षणाचे धडे गिरवले होते. ते त्यांचे मोठे भाऊ दोराबजी टाटा यांच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान होते. त्यांनी 1896 मध्ये टाटा अँड सन्समध्ये एक भागीदारी म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. वर्ष 1904 मध्ये वडिलांच्या निधनानंतर त्यांनी फ्रान्सची कंपनी युनियन फायर इन्शुरन्स कंपनीत व्यवसाय पाहणं सुरू केलं, ज्याची भारतात टाटा अँड सन्स एजंट आहे. त्यांच्याकडे ट्रेडिंग, फर्म टाटा अँड कंपनीचा पदभार आला, ती कंपनी कापूस, रेशम, मोती, तांदूळ आदी व्यवसाय करत होती.

त्यांच्याच कार्यकाळात मुंबईत 1915 मध्ये एक मोठा वीज प्रकल्प सुरू

त्यांच्या कार्यकाळात 1912 साली टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा कार्यभार सुरू झाला. त्यांच्याच कार्यकाळात मुंबईत 1915 मध्ये एक मोठा वीज प्रकल्प सुरू करण्यात आलाय. त्यातून मुंबईतल्या उद्योगांना सवलतीमध्ये वीज उपलब्ध झाली. त्यांनी सामाजिक कार्यात वाहून घेत एका ट्रस्ट फंडाची स्थापना केली, आजही तो टाटा ट्रस्टचा दुसरा सर्वात मोठा फंड आहे.

गांधीजींचाही मिळाला सहयोग

त्यांना सामाजिक कार्ये आणि दुसऱ्याला मदत करण्यात खूप आवडायचे. दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषविरोधी आंदोलनात नैतिक आणि आर्थिक मदत केली. त्याच वेळी त्यांनी 1.25 लाख रुपयांचं दान दिलं. ते स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक गोपाळ कृष्ण गोखले यांचे मित्र होते. त्यांनी गोखलेंच्या सामाजिक कार्यासाठी 10 वर्षांपर्यंत वर्षाला 10 हजारांची मदत दिली.

भारतातल्या गरिबीवर केला अभ्यास

त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये गरिबी या विषयावर अध्ययन करण्यासाठी एका संस्थेची स्थापना करून तिला वार्षिक 400 पौंडांची मदत दिली. आता ती संस्था सर रतन टाटा फाऊंडेशनच्या स्वरूपात स्थापित आहे. वर्ष 1912 मध्ये सर रतन यांच्या मदतीनं एलएसईमध्ये समाज अध्ययन विभागाची स्थापना झाली.

पाटलीपुत्रमध्ये खोदकामासाठी दिली मदत

त्यांनी 1913 ते 1917 मध्ये बिहारमधील पाटण्यातील पाटलीपुत्र येथे पुरातत्त्व अवशेष शोधून काढण्यासाठी फंडिंग केले. या खोदकामात 100 स्तंभांचा सम्राटांचा मौर्यकालीन दरबार मिळाला. त्यांनी मदतीसाठी 1905मध्ये म्हैसूरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक अँड मेडिकल रिचर्सची स्थापना केली. त्यांची समाजसेवा पाहून ब्रिटिश सरकारनं 1916 मध्ये त्यांनी नाईटहूट म्हणजे सर ही उपाधी बहाल केली. रतनजी 47 वर्षांचे असतानाच त्यांनी जग सोडलं. 5 सप्टेंबर 1918 मध्ये इंग्लंडच्या सेंट आईव्समध्ये त्यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांनी बरीचशी संपत्ती दान केली. वर्ष 1919 मध्ये 80 लाखांच्या फंडातून त्यांच्या ट्रस्टची स्थापना झाली.

संबंधित बातम्या

रतन टाटांची कंपनी टीसीएस 40 हजार फ्रेशर्स घेणार

5 जीच्या दुनियेत टाटा ग्रुप क्रांती घडवणार, मुकेश अंबानींना देणार टक्कर

Who exactly is the ‘Sir Ratan’ who has been involved in social work through the Tata Group?