नवी दिल्ली : आतापर्यंत अनेक जणांना दारुत पैसा गमविताना, कर्जबाजारी होताना तुम्ही पाहिले असेल, पण हीच दारू मोठी कमाई करुन देऊ शकते. अर्थात त्यासाठी तुम्हाला दारुचा गुत्ता घेण्याची गरज नाही. शॅम्पेनमधून (Champagne) तुम्हाला मोठी कमाई करता येईल. तुम्ही शॅम्पेन अथवा वाईनचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची राहील. तुम्हाला वाईन, शॅम्पेनमधून कमाई करता येईल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, त्यासाठी वाईन बार (Wine Bar) टाकावा लागेल की काय, त्यासाठी तर मोठा खर्च येईल आणि परवाना काढण्याची काय कमी झंझट आहे. पण तुम्हाला यापैकी कोणताही प्रकार करण्याची गरज नाही. त्यासाठी एक खास प्लॅन आहे…
अर्थव्यवस्थेला बुस्टर
समाजात दारुड्याला मान नसतो. अनेक जण पक्के बेवडे असतात. त्यांना समाजात कसलीच प्रतिष्ठा नसते. एक तर ते डोकेदुखी ठरतात अथवा चेष्टेचा विषय. दारुच्या प्रकारानुसार, दारुड्याचे स्टेट्स असते. गावरान, भिंगरी, संत्री पिणाऱ्यांना मानच नसतो. त्यापेक्षा थोडा वरचा ब्रँड आणि त्यानंतर एक एलियट वर्ग असतो. वर्ग कोणताही असो, या दारुमुळे अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस मिळाला आहे. कोणत्याही आनंदाच्या क्षणी शॅम्पेनची झाकण उघडण्याची प्रथा आहे. विंटेज शॅम्पेनपासून ते प्रीमियमपर्यंत शॅम्पेनचे अनेक प्रकार आहेत.
शॅम्पनचा खप वाढला
सोथबी वाईन आणि स्पिरिट्सचे अध्यक्ष जेमी रिची यांच्यानुसार, गेल्या एका दशकात शॅम्पेनचे चाहते वाढले आहेत. पूर्वी शॅम्पन ही श्रीमंतांची दारु होती. पण आता शॅम्पेन सर्वच वर्गातील लोकांच्या तोंडी आहे. हाँगकाँग, सिंगापूर आणि तैवान सारख्या देशात शॅम्पेनचा खप वाढला आहे. या देशातील विक्रीचे आकडे दहा वर्षात झपाट्याने वाढले आहेत. जागतिक बाजारात शॅम्पेनचा शेअर, हिस्सा वाढला आहे. जागतिक बाजारात अल्कोहलचा बाजार 1448.2 अब्ज डॉलरचा आहे. 2022 ते 2028 पर्यंत यामध्ये वार्षिक 10.3 टक्क्यांची वाढ होईल.
दोन वर्षांत बाजार फुलणार
वर्ष 2025 पर्यंत अल्कोहलाचा बाजार अजून फुलण्याची शक्यता आहे. हा बाजार 1976 अब्ज डॉलरचा होण्याची शक्यता आहे. भारताच्या सरकारी आकड्यानुसार, गेल्या काही वर्षात देशातील दारुचे उत्पादन 25 टक्के वाढले आहे. येत्या काही वर्षात हा आकडा अजून वाढणार आहे.
कमाई कशी कराल
वाईन अथवा शॅम्पेनमधून कमाई कशी कराल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर वाइन किंवा शॅम्पेनच्या लिलाव प्रक्रियेत तुम्हाला सहभागी व्हावे लागेल. ही वाईन, शॅम्पेन तुम्ही खासगी विक्रेत्याला विक्री करु शकता. तुमचा नफा प्रीमियम आणि व्हिंटेज वाईनच्या लिलावावर अवलंबून असतो. वाईन जेवढी जुनी, तितकी तिची जास्त किंमत असते. जुनी वाईन, शॅम्पेन अधिक किंमतींना विक्री होते. त्यामुळे तुम्ही काही वर्षातच मालामाल होऊ शकतात. तर काही देशांमध्ये वाईन स्टॉक एक्सचेंज पण आहे. याठिकाणी तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला मोठा फायदा होईल. तुम्ही एफडी आणि एलआयसीपेक्षा अधिकचा परतावा मिळेल.
सर्वात महागड्या शॅम्पेन