नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियानंतर आता कॅनरा बँकेतील बँक खात्यातून पैसे कट केले जात आहेत. अनेक खातेदारांनी आपल्या खात्यातून पैसे कट केल्याच्या तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून नोंदवत आहेत. खात्यातून कोणताही व्यवहार न करता पैसे कट होत असल्याची तक्रार ग्राहक करीत आहेत. आपल्या खात्यातून कोणती फसवणूक तर होत नाही अशी चिंता अनेकांना वाटू लागली आहे. वास्तविक, कॅनरा बँकेच्या अनेक खात्यांमधून बँकेने पैसे कट करण्यात आले आहेत. (Why is Rs 142 being deducted from SBI, now Canara Bank, account holders’ accounts)
ही रक्कम कॅनरा बँकेने डेबिट केली आहे आणि हे पैसे शुल्क म्हणून कट करण्यात आले आहेत. डेबिट कार्ड वार्षिक शुल्काच्या रुपात बँकेने ही रक्कम वजा केली आहे. बँक वेळोवेळी डेबिट कार्ड वार्षिक शुल्क किंवा एसएमएस शुल्क इत्यादी स्वरूपात पैसे कट करते. म्हणून, ज्या लोकांच्या खात्यातून पैसे कट केले आहेत, ते डेबिट कार्ड वार्षिक शुल्क आहे.
खातेधारकांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार डेबिट कार्ड चार्ज म्हणून कॅनरा बँकेकडून 142 रुपये कट केले गेले आहेत. या व्यतिरिक्त अनेक स्क्रीनशॉट्सदेखील शेअर केले जात आहेत, त्यानुसार बँकेकडून एसएमएस शुल्क म्हणून 18 रुपये डेबिट केले गेले आहेत. जर आपल्या खात्यातून पैसे कट केले गेले असतील तर आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही कारण बँक शुल्क म्हणून पैसे डेबिट केले गेले आहेत.
एसबीआय बँकेतही खात्यातून 147 रुपये वजा करण्यात आले होते. बँक एटीएम किंवा डेबिट कार्डसाठी देखभाल शुल्क कट करते. हे शुल्क बँकेच्या वतीने दरवर्षी बँकेच्या खात्यातून वजा केले जाते. बँकेने स्वतः ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली असून बँकेच्या वतीने शुल्क म्हणून 147.50 रुपये वजा केल्याचे म्हटले आहे.
खात्यात मिनिमम बॅलन्स नसल्यास एटीएम ट्रान्झेक्शन फेल(ATM Failed transaction) झाल्यास देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय ग्राहकांना 20 रुपये दंड भरावा लागतो. याशिवाय त्यावर स्वतंत्र जीएसटी लागू केला जाईल. एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक आणि आयसीआयसीआय बँक खात्यात मिनिमम शिल्लक नसल्यास दंड वसूल करतात. (Why is Rs 142 being deducted from SBI, now Canara Bank, account holders’ accounts)
लक्ष्मणरेषा ओलांडू नये, अन्यथा काय होतं ते कोरोनाने दाखवलं : उद्धव ठाकरेhttps://t.co/jazR2WJGDe#CMUddhavThackera #Maharashtra #Biodiversity #InternationalBiodiversityDay
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 22, 2021
इतर बातम्या
प्रत्येक डॉक्टर देव नसतो… वडिलांच्या मृत्यूला रुग्णालयच जबाबदार; अभिनेत्री संभावना सेठ लालबूंद
15 जिल्ह्यातील होम आयसोलेशन बंद होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत बाळासाहेब थोरातांची सूचना