नवी दिल्ली | 21 डिसेंबर 2023 : जर तुमचा सिबिल स्कोअर वा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तर तुम्हाला कर्ज मिळवताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण आता तुमच्यासाठी अच्छे दिन आले आहेत. कारण तुम्ही चांगला सिबिल स्कोअर नसताना सुद्धा वैयक्तिक कर्ज मिळवू शकता. क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर शक्यतोवर बँका कोणतीही आडकाठी आणत नाही. ग्राहकांना सहज कर्ज देण्यात येते. क्रेडिट स्कोअर बँक वा वित्तीय संस्थांना कर्जदाराचे आर्थिक वर्तन समोर ठेवते. त्याची कर्ज परतफेड क्षमता कशी आहे. कर्ज परतफेड करताना तो किती प्रामाणिक आहे, हे समोर येते. पण या तीन पर्यायांआधारे तुम्ही विना क्रेडिट स्कोअर कर्ज मिळवू शकता.
सिबिल स्कोअर हवा किती?
सिबिल स्कोअर जर चांगला नसेल तर वैयक्तिक कर्ज मिळणार नाही. पण हे तितकेसे पण खरे नाही. त्यात काही उपाय पण आहेत. त्याचा वापर करुन तुम्ही क्रेडिट स्कोअर चांगला नसताना पर्सनल लोन मिळवू शकता. क्रेडिट स्कोअर 300 ते 900 दरम्यान असतात. 750 पेक्षा अधिकचा क्रेडिट स्कोअर योग्य मानण्यात येतो. पण यापेक्षा सिबिल स्कोअर कमी असेल तर अडचण येऊ शकते. कर्ज देण्यास बँका मनाई करु शकता.
मग वापरा ही युक्ती