मुंबई : आदरणीय अर्थमंत्रीजी
नमस्कार,
माझे नाव सुभाष पाटील आहे. नवी मुंबईतील बाजार समितीतून गहू,तांदूळ निर्यातीचा माझा व्यवसाय आहे. माझं तर संपूर्ण बजेट कोलमडलंय
नवीन वर्षातही नवीन असं काहीही नाही. अर्थमंत्रीजी, कोरोनानंतर व्यवसाय रूळावर येत होता. गेल्या वर्षी माझा गहू आणि तांदूळ निर्यातीचा व्यवसाय जोरात होता. पंतप्रधानांनी जगभरात धान्य निर्यात करण्याचं आव्हान केल्यानंतर व्यवसाय आणखी वाढणार अशी अपेक्षा होती
पंतप्रधानांच्या आव्हानानंतर मी माझ्या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केलं. कोरोनाच्या वर्षात पगारच मोठ्या मुश्किलीनं देत होतो ,त्यामुळे व्यवसाय वाढण्याच्या आनंदात बोनस जाहीर केला . पण हा आनंद फारकाळ टिकला नाही…
पत्रात पुढे काय आहे हे जाणून घेण्यासाठी पहा व्हिडिओ :