बजेटनंतर खतं स्वस्त होणार का ? काय आहे शेतकऱ्याच्या पत्रात ?

| Updated on: Jan 06, 2023 | 6:17 PM

2023 मधील अर्थसंकल्पातून शेतकऱ्याच्या कोणकोणत्या अपेक्षा आहेत, याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना खुलं पत्र लिहिलं आहे.

बजेटनंतर खतं स्वस्त होणार का ? काय आहे शेतकऱ्याच्या पत्रात ?
Follow us on

निर्मला ताई, रामराम,

माझं नाव दिगंबर आहे

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथील शेतकरी आहे. माझी मुलगी सुनिता दहावीत शिकत आहे. शेतात बसून ती आता पत्र लिहून राहिलीय.निर्मला ताई. आज मी फार दु:खी आहे, लम्पीमुळे माझी गाय मेली सगळ्या कुटुंबाचा तिच्यावर लळा होता. भरपूर उपचार करुनही तिचा जीव वाचला नाही. अर्थमंत्रीजी, तुम्हीच सांगा माझ्यासारख्या लहान शेतकऱ्यांचे दु:ख कमी का होत नाहीत ? यंदा चांगलं भात पिकणार वाटत असताना पाऊस आलं, माझ्या सगळ्या इच्छावर पाणी फिरलं . या पत्रासोबतच नुकसानीचे फोटोही मी पाठवून राहिलोय, पाण्यात बुडल्यानंतर धानाला कोणताच व्यापारी घेत नव्हता.

पुढील पत्रात काय आहे हे जाणून घेण्यासाठी पहा  व्हिडिओ :