Gold Rate Today : ही स्वस्ताईची चाहुल? 70 हजारांवर येऊन आदळणार सोने? अमेरिकेतील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष

| Updated on: Nov 12, 2024 | 2:11 PM

Gold Price Cut : डॉलर इंडेक्स मजबूत झाला आहे. तर सोन्याची मागणी घटली आहे. त्याचा परिणाम बाजारात दिसत आहे. सराफा मार्केटमध्ये 5 नोव्हेंबरनंतर सोन्याची किंमत 3500 रुपयांनी घसरली आहे. सोन्याचा भाव आता 75 हजार रुपयांच्या घरात आला आहे. तर चांदी 6300 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

Gold Rate Today : ही स्वस्ताईची चाहुल? 70 हजारांवर येऊन आदळणार सोने? अमेरिकेतील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष
सोने-चांदीत येणार स्वस्ताई?
Follow us on

अमेरिकेत पुन्हा ट्रम्प युग अवतरलंय. राष्ट्र प्रथम हा त्यांचा नारा आहे. त्यांच्या विजयानंतर डॉलर इंडेक्समध्ये तुफान तेजीचे सत्र दिसून येत आहे. त्याचा परिणाम थेट जागतिक बाजारासह भारतीय बाजारावर दिसत आहे. सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत 5 नोव्हेंबर नंतर 4.44 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. तर जागतिक बाजारात सोने 5 टक्क्यांनी खाली उतरले. तज्ज्ञांच्या मते, डॉलर निर्देशांक या वर्षाच्या अखेरपर्यंत 107 वर पोहचेल. जागतिक बाजारात आता सोन्याच्या किंमतीत दबावा खाली दिसतील. तर दुसरीकडे ट्रम्प यांनी युक्रेनसह रशियाला युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. त्याचा ही परिणाम दिसेल.

सोन्याच्या दरात घसरण

भारतीय वायदे बाजारात सोन्याच्या भावात सातत्याने घसरण दिसत आहे. सोन्याच्या दरात 5 नोव्हेंबर नंतर 4.44 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. या दिवशी बाजार बंद होताना सोन्याचा दर 78,507 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. तेव्हापासून आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत जवळपास 3,500 रुपयांची घसरण दिसली. मंगळवारी सोन्याची किंमत MCX वर 75,020 रुपये प्रति 10 ग्रॅमवर घसरली. जागतिक आणि भारतीय बाजारात सध्या मागणी वाढण्याची शक्यता कमी आहे. भारतात लग्न सराईचा हंगाम सुरू होईल. तरीही जागतिक बाजारातील घाडमोडींमुळे सोन्याचा भाव कमी असेल असा दावा करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

जागतिक बाजारात डॉलर तेजीत

सोन्याच्या किंमतींवर डॉलरच्या तेजीचा थेट परिणाम दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर डॉलर मजबूत स्थितीत आला आहे. गेल्या 5 व्यापारी सत्रात डॉलर इंडेक्स 2.21 टक्क्यांनी वधारला आहे. ट्रम्प यांच्या विजयाने अमेरिकन व्यापारी आणि औद्योगिक जगताला नवीन भरते आले आहे. आगामी काळात डॉलर निर्देशांक अजून मजबूत होण्याचा अंदाज आहे. सध्या डॉलर निर्देशांक 105.71 स्तरावर आहे. तो लवकरच 106.52 या उच्चांकी स्तरावर पोहचू शकतो. त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर परिणाम दिसू शकतो. सोने स्वस्त होण्याची शक्यता आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला सराफा बाजारात सोने आणि चांदीत घसरण दिसून आली. सोमवारी सोने 600 रुपयांनी घसरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,910 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी एक हजार रुपयांनी घसरली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,000 रुपये इतका आहे. जर डॉलर मजबूत स्थिती पोहचला तर कदाचित सोने आणि चांदीत अजून घसरण दिसू शकते.