अर्थमंत्रीजी नमस्कार
माझं नाव मनोज आहे. रायगड जिल्ह्यात एका केमिकल कंपनीमध्ये काम करतो. देवाच्या कृपने सध्या व्यवस्थित सुरू आहे. ठिकठाक नोकरी आहे. खर्चही व्यवस्थित होतो. चिंता फक्त भविष्याची आहे. बचतीतले पैसे कुठं गुंतवणूक करू हे समजत नाही.
सहकारी म्हणतात शेअर बाजारात गुंतवणूक कर, मात्र, मेहनतीचा पैसा शेअर बाजारात गुंतवण्याची हिम्मत होत नाही. शेअर बाजारात अनेक जण बुडालेत असं एकलंय. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठीही मागील वर्ष चांगलं नव्हतं असं एकलंय. फक्त चार टक्के रिटर्न मिळालंय
मी पीपीएफमध्ये आणि बँक एफडीमध्ये गुंतवणूक करतो. विम्यातला गुंतवणुकीतून काही विशेष असा परतावा मिळत नाही. मात्र. LIC वर विश्वास आहे.त्यामुळे गुंतवणूक केली आहे. रिटर्न कमी मिळालं तरी चालेल जास्त जोखिम घेत नाही….
पुढील पत्रातील मजकूर जाणून घेण्यासाठी पहा व्हिडिओ :