नवी दिल्ली | 15 नोव्हेंबर 2023 : सहारा समूहाचे सुप्रीमो सुब्रत रॉय यांचे निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर आता गुंतवणूकदारांच्या जीवाला घोर लागला आहे. आपला पैसा आता बुडणार तर नाही ना, हा त्यांच्या जीवाला घोर लागला आहे. जर पैसा परत मिळणार आहे, तर तो कसा मिळणार, याविषयी पण त्यांच्या मनात प्रश्नांची मालिका सुरु झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर लोकांना त्यांचा पैसा परत मिळण्याची आशा लागली होती. अनेक लोकांनी सहारा रिफंड पोर्टलवर पैसा परत मिळण्यासाठी अर्जफाटा केला आहे. पण सहारा श्री सुब्रत रॉय यांच्या निधनानंतर त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे.
4 कोटी गुंतवणूकदार
सहारा समूहात देशभरातील 4 कोटी लोकांनी गुंतवणूक केली आहे. सहारा रिफंड पोर्टलमार्फत 5000 कोटी रुपये परत करण्याचे आश्वासन यापूर्वीच केंद्रीय सहकार खात्याने दिले आहे. त्यानुसार या पोर्टलवर गुंतवणूकदारांनी त्यांच्या गुंतवणुकीचा तपशील भरला आहे. त्यातील अनेकांना ही रक्कम परत मिळण्याची प्रतिक्षा आहे. त्यात रॉय यांच्या निधनानंतर गुंतवणूकदारांना अधिक भीती वाटत आहे.
देशभरातील गुंतवणूकदारांना दिलासा
देशातील कोट्यवधी ग्राहकांचा पैसा सहारामध्ये अडकला आहे. त्यातील काही गुंतवणूकदार तर जीवंत ही नाहीत. उत्तर भारतासह पश्चिम बंगालपर्यंत गुंतवणूकदारांचे मोठे जाळे होते. यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेशातील अनेक गुंतवणूकदारांचा पैसा अडकला होता. हे पोर्टल सुरु झाल्याने सहारा मधील पैसा परत मिळण्याची आशा वाढली आहे.
इतकी सोपी प्रक्रिया