Marathi News Business Will your pocket burn by the end of February Declining session in crude oil what is today's petrol diesel price
Petrol Diesel Price : महिन्याच्या शेवटच्या दिवशी खिशाला झळ? पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव काय
Petrol Diesel Price : फेब्रुवारी महिन्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून मार्च सुरु होत आहे. आज महिन्याच्या शेवटी तुमच्या खिशाला झळ बसणार की मिळणार थोडा दिलासा? काही शहरात पेट्रोल-डिझेलचा भाव कमी तर काही ठिकाणी हा भाव जास्त आहे.
आजचा भाव काय
Follow us on
नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किंमतींवर (Crude Oil Price) ठरतात. भारतात गेल्यावर्षी मे महिन्याच्या अखेरीस भावात शेवटचा मोठा बदल झाला होता. त्यानंतर संपूर्ण देशात राज्य सरकारच्या कर धोरणाव्यतिरिक्त कुठेच इंधनाच्या भावात मोठा बदल झालेला नाही. प्रत्येक शहरातील पेट्रोल-डिझेलच्या भावात (Petrol Diesel Price) तफावत दिसून येते. कच्चा तेलाच्या भावानुसार, आज 28 फेब्रुवारी, 2023 रोजी डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलमध्ये (WTI Crude Oil) 0.09 टक्क्यांची वाढ होऊन किंमत 75.75 डॉलर प्रति बॅरलवर पोहचली. तर 0.85 टक्क्यांची घसरण नोंदवत 82.45 डॉलर प्रति बॅरलवर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) व्यापार करत आहे.
गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात भारत रशियाकडून केवळ 0.2 टक्के इतके क्रूड ऑईल (Russian Crude Oil) खरेदी करत होता. यंदा हा वाटा 28 टक्क्यांवर पोहचला आहे. जानेवारीत भारताने प्रत्येक दिवशी 1.27 दशलक्ष बॅरल तेलाची रशियाकडून आयात केली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत चढउतार होत असली तरी वर्षभरात मात्र या किंमती 15 टक्क्यांनी घसरल्या आहेत.. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे.
भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी सहा वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
हे सुद्धा वाचा
करासंबंधीचे ठळक मुद्दे
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 22 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती.
देशात गेल्यावर्षी 21 मे रोजीनंतर इंधनाच्या किंमती मोठा बदल दिसून आला.
पेट्रोलवर प्रति लिटर 8 रुपये तर डिझेलवर प्रति लिटर 6 रुपयांची कपात झाली.
त्यानंतर काही राज्यांनी ही त्यांच्या मूल्यवर्धित करात (Value Added Tax-VAT) कपात केली होती.
हिमाचल प्रदेश सरकारने यावर्षीच्या सुरुवातीला डिझेलवर 3 रुपये व्हॅट लावला.
पंजाब सरकारने पेट्रोल-डिझेलवर प्रति लिटर 90 पैसे सेस लावला.
केरळचे अर्थमंत्री के एन बालगोपाल यांनी पेट्रोल-डिझेलवर 2 रुपये प्रति लिटर सामाजिक सुरक्षा उपकर (Cess) लावला.
पेट्रोल आणि डिझेल कमी किंमतीत विक्री केल्याने 21,200 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तेल कंपन्यांची ओरड आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचा भाव
मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
अहमदनगर पेट्रोल 106.51 तर डिझेल 92.84 रुपये प्रति लिटर
अकोल्यात पेट्रोल 106.24 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
अमरावतीत 107.50 तर डिझेल 93.66 रुपये प्रति लिटर
औरंगाबाद 106.85 पेट्रोल आणि डिझेल 93.24 रुपये प्रति लिटर
नागपूरमध्ये पेट्रोल 106.82 तर डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर
नांदेडमध्ये पेट्रोल 108.21 तर डिझेल 95.15 रुपये प्रति लिटर
जळगावमध्ये पेट्रोल 107.56 आणि डिझेल 93.90 रुपये प्रति लिटर
नाशिकमध्ये पेट्रोल 106.43 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
लातूरमध्ये पेट्रोल 107.73 तर डिझेल 93.85 रुपये प्रति लिटर
कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.75आणि डिझेल 92.61 रुपये प्रति लिटर
पुण्यात पेट्रोलचा भाव 106.16 आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर
सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.67 रुपये तर डिझेल 93.18 रुपये प्रति लिटर आहे