नवी दिल्ली | 22 सप्टेंबर 2023 : देशातील प्रमुख आयटी कंपन्यांमध्ये विप्रो (Wipro) ही एक आहे. कंपनीने अपर्णा सी अय्यर (Aparna Iyer) यांच्या खांद्यावर नवीन जबाबदारी दिली आहे. त्यांना चीफ फायनेन्शिअल ऑफिसरची (CFO) जबाबदारी दिली आहे. अय्यर या 2003 पासून विप्रोसोबत जोडल्या गेल्या आहेत. सिनिअर इंटरनल ऑडिटर म्हणून त्या रुजू झाल्या होत्या. कंपनीत त्यांनी 20 वर्षे सेवा बजावली आहे. त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर कामगिरी बजावली आहे. जतीन दलाल यांनी सीएफओ पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अपर्णा अय्यर यांची या पदावर वर्णी लागली. दलाल यांनी गुरुवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. अपर्णा विप्रो सीईओ थिएरी डेलापोर्ट यांना रिपोर्ट करतील. त्या कंपनीच्या कार्यकारी मंडळात पण असतील.
अनेक महत्वपूर्ण पदावर कामगिरी
अपर्णा या मुळच्या कर्नाटकमधील आहेत. गेल्या 20 वर्षांपासून त्या विप्रोमध्ये काम करत आहे. या दरम्यान कंपनीत त्यांनी फायनान्स प्लॅनिंग एनालिसिस मॅनेजर, बिझनेस फायनान्स हेड, फायनान्स प्लनिंग अँड एनालिसिस, कॉर्पोरेट ट्रेझरार आणि इन्व्हेस्टर रिलेशन विभाग यासह इतर पदावर त्यांनी काम केले. सीएफओ पदावर नियुक्ती पूर्वी त्यांनी फुलस्ट्राईड क्लाऊड ग्लोबल बिझनेस लाईनमध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर काम केले आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीला 11.95 टक्के फायदा झाला. कंपनीला 2,870.1 कोटींचा फायदा झाला. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीला 2,563.6 कोटी रुपयांचा फायदा झाला.
सुवर्ण पद विजेत्या
अपर्णा अय्यर या सीए आहेत. 2002 बॅचमध्ये त्यांनी सीएमध्ये सुवर्ण पद पटकावले होते. इन्स्टिट्यूट अकाऊटंट्स ऑफ इंडिया (ICAI) मध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांनी 2001 मध्ये वाणिज्य शाखेत पदवी घेतली. Narsee Monjee मध्ये त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी मिळवली. सीए झाल्यानंतर त्या विप्रोत रुजू झाल्या. अपर्णा अय्यर यांना फायनेन्शिअल रिस्क मॅनेजमेंट, कॅपिटल अलॉकेशन, फंड रेजिंग, बिझनेस स्ट्रॅटर्जी या क्षेत्रात दीर्घ अनुभव आहे.
जतीन दलाल यांनी मानले आभार
जतीन दलाल यांनी विप्रोच्या सीएफओ पदाचा राजीनामा दिला. गेल्या अनेक वर्षांपासून विप्रोने अनेक पदावर कामाची संधी दिली. पण आता व्यावसायिक लक्ष्य गाठण्यासाठी राजीनामा देत असल्याचे दलाल यांनी स्पष्ट केले. त्यांच्या जागी अपर्णा अय्यर सीएफओ असतील.