नवी दिल्ली | 22 February 2024 : जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारताच्या जीडीपीत 1.5% वाढ झाली असती, पण मनुष्यबळात महिलांची संख्या कमी असल्याने भारताला विकासाचा हा गाडा जोरकसपणे ओढता आलेला नाही. नोकरदार महिलांपेक्षा गेल्या काही वर्षात महिलांचा व्यवसायातील वाटा झपाट्याने वाढत आहे. पण सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या भारताला अजून मोठा टप्पा गाठायचा आहे. केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना आणल्या (Govt Schemes for Women Entrepreneurs) आहेत. जाणून घ्या या योजनांविषयी…
महिलांसाठी मुद्रा कर्ज (Mudra Loan for Women) – केंद्र सरकारने महिलांसाठी मुद्रा कर्ज योजना आणली आहे. महिलांना व्यवसाय जोमाने करता यावा, यासाठी त्यांना आर्थिक मदत करण्यात येते. ब्युटी पार्लर, ट्यूशन सेंटर, टेलरिंग शॉप वा इतर छोट्या व्यवसायासाठी कर्जाचा पुरवठा करण्यात येतो. या कर्जासाठी कोणतीच हमी द्यावी लागत नाही. यामध्ये शिशू लोन, किशोर लोन, तरुण लोन अशा श्रेणी असतात. नियम व अटींप्रमाणे कर्ज पुरवठा होतो.
अन्नापूर्णा स्कीम (Annapurna Scheme) –अन्नपूर्णा योजनेत केंद्र सरकार या इंडस्ट्रीशी संबंधित महिला उद्योजिकांना 50,000 रुपयां पर्यंतच्या कर्जाचा पुरवठा करते. या कर्जातून अन्न प्रक्रियेसंबंधीची भांडीकुंडी, मिक्सर ग्राईंडर, हॉट केस, टिफिन बॉक्स, वर्किंग टेबल इत्यादी साहित्य खरेदीसाठी करता येते. कर्ज मंजूर झल्यानंतर पहिल्या महिन्यात ईएमआय द्यावा लागत नाही. हे कर्ज 36 मासिक रक्कमेत परतफेड करावे लागते. बाजार दरानुसार व्याज दर आकारण्यात येते.
स्त्री शक्ति योजना (Stree Shakti Yojana) – सरकारची स्त्री शक्ती योजना महिलांसाठीची एक खास योजना आहे. ही योजना महिला उद्योजिकांना मदत करते. ज्या महिलांचा संयुक्त उद्योगात मोठा वाट आहे. त्या महिलांन या कर्ज योजनेचा मोठा फायदा होतो. या योजनेची मदत घेण्यासाठी राज्य सरकारच्या ईडीपी (Entrepreneurship Development Programme) अंतर्गत नामांकन असणे आवश्यक आहे. या योजनेत 2 लाख रुपयांपेक्षा अधिकच्या कर्जावर 0.05% व्याज रिबेट मिळेल.
स्टँड अप इंडिया योजना (Stand Up India Yojana) – वर्ष 2016 मध्ये ही योजना सुरु करण्यात आली होती. खासकरुन एससी-एसटी गटातील व्यावसायिक महिलांसाठी ही योजना आहे. ही योजना पहिल्यांदाच व्यवसाय सुरु करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत करते. या योजनेत 10 लाख रुपये ते 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. उत्पादन, सेवा, कृषी आधारीत व्यवसायांसाठी हे कर्ज देण्यात येते.