Women’s Day | उद्योग जगतात असा रोवला झेंडा; या महिलांची किर्ती दिगंतरा

| Updated on: Mar 08, 2024 | 10:47 AM

Women's Day | भारतीय उद्योजिका सावित्री जिंदल, वंदना लूथरा आणि किरण मझूमदार यांच्यासह अनेक भारतीय महिलांनी त्यांची ओळख निर्माण केली आहे. अनेक भारतीय महिला या जगातील टॉप ब्रँडच्या सीईओ आहेत. त्यांनी उंच भरारी घेतली आहे. त्यांचे कर्तृत्व सिद्ध केले आहे.

Womens Day | उद्योग जगतात असा रोवला झेंडा; या महिलांची किर्ती दिगंतरा
Follow us on

नवी दिल्ली | 8 March 2024 : आज जगभरात महिला दिवस साजरा करण्यात येत आहे. अनेक क्षेत्रात महिलांनी झेंडा रोवला आहे. राजकारण, विज्ञान, अर्थपासून तर उद्योगापर्यंत अनेक क्षेत्रात देशातील महिलांनी त्यांचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. उद्योग क्षेत्रात सावित्री जिंदल, वंदना लूथरा, किरण मझुमदारांसह इतर अनेक महिलांनी त्यांची स्वतःची ओळख निर्माण केली आहे. यातील काही महिला तर जगातील आघाडीच्या ब्रँडच्या सीईओ आहेत. त्यांनी नवी उंची गाठली आहे. व्यावसायिक जगतात मोठे नाव कमावले आहे.

वंदना लूथरा

वंदना लूथरा आज देशातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित भारतीय उद्योजिकांपैकी एक आहेत. VLCC Healthcare च्या त्या संस्थापक आहेत. ब्युटी अँड वेलनेस सेक्टर स्किल अँड काऊसिलच्या त्या अध्यक्ष आहेत. सौंदर्य उद्योगात कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. आशियातील टॉप-50महिला उद्योजिकांमध्ये त्या 26 व्या क्रमांकावर आहेत. आज दक्षिण आशिया, आफ्रिकासह 13 देशांतील 153 शहरांमधील 326 ठिकाणी त्यांची संस्था काम करते.

हे सुद्धा वाचा

किरण मझूमदार शॉ

भारतीय उद्योजिका, आयआयएम-बंगळुरू च्या संस्थापिका, बायोटेक्नोलॉजी कंपनी, बायोकॉन लिमिटेडच्या अध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या किरण मझुमदार शॉ यांच्या खाद्यांवर आहेत. त्यांना विज्ञान आणि रसायन विज्ञानमधील अतुलनीय योगदानाबद्दल ओथम सुवर्ण पदक मिळाले आहे. त्यांनी अनेक नामांकित संस्थांमधून शिक्षण पूर्ण केले आहे. एका भाड्याच्या घरात त्यांनी बायोकॉन कंपनीची सुरुवात केली होती.

नैना लाल किडवई

देशातील लोकप्रिय आणि यशस्वी उद्योजिकांमध्ये नैना लाल किडवई यांचे नाव सहभागी आहे. त्या व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. एचएसबीसी बँकेच्या त्या प्रमुख आहेत. त्या फिक्कीच्या अध्यक्ष पण होत्या. परदेशी बँकांची कमान सांभाळणाऱ्या त्या पहिला महिला आहेत. त्यांनी अनेक महत्वाच्या पदावर काम केले आहे. त्यांनी पण अनेक नामांकित विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे.

इंद्रा नूई

भारतीय वंशाच्या अमेरिकन इंद्रा नूई यांना तर सर्व जग ओळखते. कर्तबगार महिलांच्या यादीत त्यांचे नाव सर्वात अगोदर घेण्यात येते. त्यांनी पेप्सिकोच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. अत्यंत मेहनतीने त्या या पदावर पोहचल्या आहेत. त्यांनी अनेक मोठ्या ब्रँड्समध्ये काम केले आहे.