नवी दिल्ली : चीनवर कोरोना (Corona) उलटला. त्यामुळे चीनमध्ये (China)पुन्हा या महामारीने पकड घट्ट केली आहे. त्याचा या देशाच्या अर्थव्यवस्थेवर (Economy) मोठा विपरीत परिणाम दिसून येत आहे. सर्वच जागतिक संस्थांनी चीनच्या विकास दराचे दावे खोडून काढले आहे. जागतिक बँकेनेही (World Bank) विकास दराचा अंदाज घटविला आहे. तर भारताच्या विकासाचा (India’ Growth Rate) अंदाज संशोधित करुन त्यात वृद्धी करण्यात येत आहे. जागतिक कंपन्या आता भारताकडे मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पाहत असून अनेक ब्रँड उत्पादन सुरु करण्यासाठी आग्रही आहेत.
कोरोनो नियंत्रणाबाहेर गेल्याने चीनची अर्थव्यवस्था मेटाकुटीला आाली आहे. मंगळवारी जागतिक बँकेने याविषयीचा संशोधित अहवाल दिला आहे. त्यानुसार, चीनचा विकास दर घटविला आहे. 2.7 टक्क्यांची घसरण नोंदवली आहे. यापूर्वी जून 2022 मध्ये बँकेने चीनचा विकास दर 4.3 टक्के नोंदविला होता. 8.1 टक्क्यांहून हा अंदाज 4.3 टक्क्यांवर आला होता.
भारताच्या विकास दराविषयी जागतिक रेटिंग्स संस्था आशावादी आहेत. या संस्थांनी भारताच्या विकासावर समाधान व्यक्त केले आहे. काही संस्थांनी संशोधन करुन भारताचा विकास दर 7 टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे.
दरम्यान चीनमध्ये अनेक जागतिक कंपन्यांचे उत्पादन युनीट आहेत. कोरोना काळात या कंपन्यांनी चीनमधून युनीट गुंडाळण्याचा निर्णय घेतला. काही कंपन्या इंडोनेशियाकडे वळल्या. तर काही कंपन्यांना भारत खुणावत आहे. त्यामुळे या कंपन्या भारतात गुंतवणुकीसाठी आणि त्यांचे उत्पादन प्रकल्प सुरु करण्यासाठी इच्छुक आहे.
या कंपन्यांनी भारतात गुंतवणूक वाढविल्यास त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल. कुशल मनुष्यबळाच्या हाताला काम मिळेल. येथेच उत्पादन झाल्याने अनेक महागड्या वस्तू स्वस्तात मिळतील. अर्थव्यवस्थेला नवीन उभारी मिळेल.
सध्या जगभरात कोरोनाची नवीन आकडेवारी भयभीत करणारी आहे. गेल्या आठवड्यात कोरोनाचे 36 लाख नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर 10 हजार जणांचा मृत्यू ओढावला आहे. येत्या 90 दिवसात चीनमधील 60 टक्के आणि तर जगातील 10 टक्के लोकसंख्या कोरोनाने संक्रमीत होण्याची शक्यता आहे.