नवी दिल्ली | 8 सप्टेंबर 2023 : येत्या चार वर्षांत जगात भारताचा दबदबा दिसू शकतो. चीनची आर्थिक नाडी नाजूक आहे. अनेक दिग्गज कंपन्यांनी चीनला रामराम ठोकण्याची तयारी सुरु केली आहे. या कंपन्या मलेशिया, इंडोनेशियाच नाहीतर भारतात पण प्रकल्प उभारत आहेत. भारत ही त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची बाजारपेठ आहे. अमेरिका, चीननंतर येत्या काही दिवसांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ ठरणार आहे. जगाचा केंद्रबिंदू चीनकडून भारताकडे हालत आहे. BMI च्या एका अहवालानुसार, मध्यमवर्गाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. भारतात महागाई दर घसरला तर हा वर्ग खर्च करेल. त्यासाठी केंद्र सरकारला प्रयत्न करावे लागतील. नव मध्यमवर्ग उदयाला येत आहे. त्यामुळे भारत 2027 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ (3rd biggest consumer country of India)
असेल.
सध्या भारताचा क्रमांक कितवा
ग्राहक बाजारपेठेत भारत जगात पाचव्या क्रमांकावर आहे. फिच सोल्यूशन्स कंपनीचा अंदाज आहे की, रिअल हाऊसहोल्ड स्पेडिंगमध्ये 29 टक्के वाढ झाल्याने भारत दोन क्रमांक अजून उसळी घेईल. भारताची बाजारपेठ मजबूत होईल. मध्यमवर्गाची क्रयशक्ती वाढेल. हा वर्ग महागाईवर मात करेल. महागाई कमी करण्याच्या सरकारी प्रयत्नांना यश आले तर भारत लवकर केंद्रस्थानी येईल. पण त्यासाठी केंद्र सरकारला विशेष प्रयत्न आणि सुधारणा करण्याची गरज असेल.
या अर्थव्यवस्थांना गती
या अहवालानुसार, केवळ भारतातच सुधारणांचे वारे वाहत आहेत असं नाही. तर चीनला शह देण्यासाठी आशियातील इतर देशांनी पण चंग बांधला आहे. परदेशी कंपन्यांना पायघड्या घालण्यात येत आहे. आर्थिक स्तरावर मोठे बदल सुरु आहे. यामध्ये इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि थायलंड या देशांचा समावेश आहे. मलेशियाने पण मोठी झेप घेतली आहे.
भारत सध्या अग्रेसर
पूर्वेतील या देशांपेक्षा अर्थातच भारत ही मोठी बाजारपेठ आणि अर्थव्यवस्था म्हणून झपाट्याने पुढे येत आहे. या चारही देशांपेक्षा भारतातील प्रति व्यक्ती हाऊसहोल्ड स्पेडिंग, म्हणजे क्रयशक्ती वार्षिक आधारावर 7.8 टक्के अधिक आहे. असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन्स नेशन्स (ASEAN) आणि भारत यांच्यातील ही तफावत तिप्पट वाढली आहे.
तरुण वर्गावर भिस्त