उद्योग जगतातून मोठी बातमी समोर येत आहे. अदानी समुहाचे (Adani Group) संस्थापक आणि अध्यक्ष असलेले गौतम अदानी (Gautam Adani) हे आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. गौतम अदानी हे आशियामधील सर्वात श्रींमत तर जगातील पाचवे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. नुकतीच फोर्ब्सकडून रिअल-टाईम अब्जाधीशांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीनुसार गौतम अदानी यांनी रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना संपत्तीच्या बाबतीत मागे टाकत आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा बहुमान पटकला आहे. ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार मुकेश अंबानींची एकूण संपत्ती ही 87.9 अब्ज डॉलर्स इतकी आहे. तर गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकत प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यांची एकून संपत्ती ही 122.8 अब्ज डॉलर्स वर पोहोचली आहे. अदानींच्या खासगी संपत्तीमध्ये 12 अब्ज डॉलरची वाढ झाली असून, ते वर्षभरात सर्वाधिक संपत्ती वाढलेले व्यक्ती देखील ठरले आहेत.
फोर्ब्सकडून रिअल-टाईम अब्जाधीशांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीनुसार गौतम अदानी हे आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. वर्षभरात त्यांच्या खासगी संपत्तीत एकूण 12 अब्ज डॉलरची वाढ झाली असून ते याचबरोबर वर्षभरात सर्वाधिक संपत्ती वाढलेले व्यक्ती देखील ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 122.8 अब्ज डॉलर्स वर पोहोचली आहे. त्यांनी याबाबतीत आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असेलेल्या मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे. त्यांनी केवळ मुकेश अंबानी यांनाच नाही तर वॉरन बफे यांना देखील अदानी यांनी संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले आहे. अदानी हे जगातील पाचवे श्रीमंत व्यक्ती बनले असून, त्यांची एकूण संपत्ती 122.8 अब्ज डॉलर्स वर पोहोचली आहे. तर वॉरन बफे यांची एकूण संपत्ती ही 121.7 अब्ज डॉलर इतकी आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये अदानी समूहाच्या शेअर्सची किंमत 600 टक्क्यांनी वाढली आहे, अदांनी समुहाची प्रमुख गुंतवणूक ही बंदर क्षेत्रात आहे. अनेक प्रमुख बंदरे ही अदानी समुहाच्या मालिकीची आहेत. तसेच अदानी ग्रुप हा पर्यावरण क्षेत्रात देखील काम करत असून, येत्या 2070 पर्यंत भारताला कार्बनमुक्त बनवण्याचा संकल्प कंपनीने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर कंपनीकडू हरित ऊर्जेला प्राधान्य देण्यात येत आहे.
जीएसटीची पुन्हा लगीनघाई; नवीन वऱ्हाडींची सरबराई, 28 टक्के जीएसटीतंर्गत 143 वस्तुंचा समावेश होणार
Gold-silver prices: खुशखबर! सोने झाले स्वस्त, आजच खरेदी करा; जाणून घ्या सोन्या-चांदीचे भाव